aanvi kamdar : धबधब्याजवळ Reel शूट करताना मुंबईकर रील स्टार अन्वी कामदार हिचा ३५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  aanvi kamdar : धबधब्याजवळ Reel शूट करताना मुंबईकर रील स्टार अन्वी कामदार हिचा ३५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

aanvi kamdar : धबधब्याजवळ Reel शूट करताना मुंबईकर रील स्टार अन्वी कामदार हिचा ३५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

Jul 17, 2024 10:53 PM IST

Reel star aanvi kamdar Death : कुंभे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा इन्स्टाग्रामसाठी रिल बनवताना दरीत पडून मृत्यू झाला. अन्वी कामदार (aanvikamdar) असे या तरुणीचे नाव आहे.

रीलस्टार अन्वी कामदारचा ३५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू
रीलस्टार अन्वी कामदारचा ३५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

सध्या राज्यभर पावसाने जोर धरला असल्याने अनेक धबधबे व धरणे ओसंडून वाहत आहेत. यामुळे नागरिक वर्षा पर्यटनासाठी धबधब्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. मात्रसहलीचा आनंद लुटताना दाखवलेला अतिउत्साह अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे.अतिउत्साही पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशातच आपला जीव गमावतात. असाच प्रसंग रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे घडला आहे. कुंभे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा इन्स्टाग्रामसाठी रिल बनवताना दरीत पडून मृत्यू झाला. अन्वी कामदार (aanvikamdar) असे या तरुणीचे नाव आहे. अन्वी व्यवसायाने सीए होती तसेच सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणून ओळखली जात होती.

२७ वर्षीय अन्वी वर्षा पर्यटनासाठी मुंबईतून आपल्या मित्रांसोबत रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधबा परिसरात आली होती. धबधब्याच्या बाजूला एका छोट्या सुळक्यावर जाऊन रील बनवताना तोड जाऊन ती ३५० फूट खोल दरीत कोसळली. तिच्यासोबत असलेल्या मित्रांनी याची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याची माहिती जवळच्या सर्व रेस्क्यू टीमला दिली.कोलाड, माणगाव, महाड येथून प्रशिक्षीत बचाव पथकांना पाचारण करण्यात आले.याची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड या टीने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुपारी साडे बारा वाजल्यापासून बचाव कार्य सुरू करण्यात आले.

पावसामुळे दरीत उतरणे मोठे आव्हानात्मक काम होते.दोरीच्या साह्याने ही बचाव पथके दरीत उतरली.खाली उतरत असताना मोठ-मोठे दगड बचाव पथकाच्या अंगावर पडत होते. १५ मिनिटात टीम तरुणीच्या जवळ पोहोचली. तरुणी निपचिप पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वाटले मात्र जवळ जाऊन पाहताच तिचा श्वास सुरू असल्याचे जाणवले. तसेच ती प्रतिसाद देत असल्याचे जाणवले. त्यानंतर तिला सुरक्षितरित्या स्ट्रेचरवरती बांधण्यात आले. तिला स्ट्रेचरच्या साह्याने दोरीने ओढून वर काढण्यात आले.

१२० मीटरच्या अंतरापर्यंत तिला उचलून आणले. त्यानंतर दोरीच्या साह्याने २०० ते २५० फूट वरखेचण्यात आले.जखमी अवस्थेत तरुणीला माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. अन्वी कामदार मुंबईत माटुंगा येथे रहात होती. पावसाळी पर्यटनासाठी ती सकाळच्या सुमारास धबधब्यावर आली होती. चार्टर्ड अकाऊंटंट असलेली ही तरुणी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहे. फेसबुक व इन्स्टाग्रावर तिचे लाखो फॉलअर्स आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर