Pune snake bite : पुणे जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण घटले तर शहरात वाढले; वर्षभरात केवळ ४३० घटनांची नोंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune snake bite : पुणे जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण घटले तर शहरात वाढले; वर्षभरात केवळ ४३० घटनांची नोंद

Pune snake bite : पुणे जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण घटले तर शहरात वाढले; वर्षभरात केवळ ४३० घटनांची नोंद

Aug 23, 2023 10:38 AM IST

Pune snake bite : पुणे जिल्ह्यात दुर्गम भागात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना घडत होत्या. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे आढळले आहे. पुणे जिल्हा परिषदेने दिलेल्या तातडीच्या आरोग्यसेवेमुळे हे शक्य झाले आहे.

Snake Viral Video
Snake Viral Video

पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक दुर्गम भाग आहे. या सोबतच वनसंपत्ती देखील आहे. या दुर्गम भागात आदिवासी वाड्यावर अनेक नागरिक राहत असतात. या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना या घडत होत्या. मात्र, यात गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, या उलट शहरी भागात या घटना वाढल्या आहेत. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत जिल्ह्यात केवळ ४३० घटनांची नोंद झाली आहे. तर गेल्या वर्षी ६१७ सर्पदंशाच्या घटना घडल्या होत्या.

Fawad Hussain: पाकिस्तान तोंडघशी! चंद्रयान २ ची खिल्ली उडवण्याऱ्या नेत्याने आता केले कौतुक; केली 'ही' मागणी

पुणे जिल्ह्यात १४ तालुके आहेत. त्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा ही दुर्गम आहेत. या ठिकाणी असलेल्या डोंगर रंगात मोठ्या प्रमाणात सर्प दंशाच्या घटना घडत होत्या. मात्र, आरोग्य व्यवस्था सक्षम झाल्यामुळे या घटना कमी झाल्या असल्याची माहिती हंकारे यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेने हिंदुस्थान टाइम्स मराठीला दिलेल्या आकडेवारीनुसार, पुणे ग्रामीण भागात, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५३४ प्रकरणांच्या तुलनेत यावर्षी केवळ २४० सर्प दंशाच्या घटनांची नोंद झाली. जिल्ह्याच्या तुलनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या वर्षी सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली. पुण्यात ६६ तर पिंपरी-चिंचवड मध्ये १२४ सर्प दंशाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Chandrayaan 3 : रांचीत तयार झाले लाँचिंग पॅड तर फतेहपूरमध्ये कॅमेरा; देशातील 'या' शहरात तयार झाले चांद्रयान

ग्रामीण भागात, 1४ तालुक्यांपैकी तीन तालुक्यांमध्ये जास्त संख्या नोंदवली गेली, यामध्ये जुन्नर तालुक्यात ५४, शिरूर तालुक्यात ३५ आणि हवेली तालुक्यात १८ घटना घडल्या. तर २०२२ मध्ये जुन्नरमध्ये ११५, तर शिरूर आणि हवेली तालुक्यात अनुक्रमे ४८ आणि २९ सर्प दंशाच्या घटना नोंदवल्या गेल्या.

पुणे जिल्ह्यात विविध प्रकारचे साप आढळतात. कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर आणि इचिस कॅरिनेटस या चार प्रकारचे विषारी साप पुण्यात आढळतात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यामुळे या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. सर्पदंशाच्या घटना घडल्या असूनही गेल्या दोन वर्षांत एकही जीवितहानी झालेली नाही.

डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, "पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकरणे जुन्नर, बारामती, हवेली यांसारख्या ग्रामीण आणि आदिवासी भागात आढळून येत आहेत. सध्या सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशासाठी लसींचा अतिरिक्त संग्रह आहे. सर्पदंशाच्या केसेस हाताळण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.”

पुणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले, “आमच्या निरीक्षणानुसार, महानगरपालिकेच्या हद्दीत, बहुतेक साप चावण्याच्या घटना बांधकामाधीन जागेवरून येतात आणि बांधकाम कामगारांना याचा फटका अनेकदा बसतो. पर्यावरणावरील अतिक्रमणाचे हे स्पष्ट संकेत आहे. अनेक वेळा बांधकाम कामगार दाट झाडीजवळ झोपड्या उभारतात. रात्रीच्या वेळी त्यांच्या घरात साप शिरण्याची शक्यता जास्त असते.”

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर