Pune Rain Update : पुण्यासाठी रेड अलर्ट! पुढचे काही तास जोरदार बरसणार; लष्करासह यंत्रणा सतर्क-red alert of rain for pune army and ndrf on alert mode after khadkwasla dam water increases ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain Update : पुण्यासाठी रेड अलर्ट! पुढचे काही तास जोरदार बरसणार; लष्करासह यंत्रणा सतर्क

Pune Rain Update : पुण्यासाठी रेड अलर्ट! पुढचे काही तास जोरदार बरसणार; लष्करासह यंत्रणा सतर्क

Aug 04, 2024 07:15 AM IST

Pune Rain Update : पुण्यात पुढील काही तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने पुण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे

पुण्यासाठी रेड अलर्ट! पुढचे काही तास जोरदार बरसणार; लष्करासह यंत्रणा अलर्ट
पुण्यासाठी रेड अलर्ट! पुढचे काही तास जोरदार बरसणार; लष्करासह यंत्रणा अलर्ट (HT_PRINT)

Pune Rain Update : पुण्यात पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या मुळे हवामान विभागाने पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या सुचनेसार घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असून धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी परिसरात देखील मोठा पाऊस झाला असून खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी देखील यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जागो जागी अग्निशामक दल व एनडीआरएफच्या पथकासह लष्कराच्या तुकड्यांना देखील तैनात करण्यात आले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात पुढच्या काही तासांसाठी भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे मुठा नदीची पाणी पातळी वाढली आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली असून येथील पुलाची वाडी व प्रेमनगर येथील १०० घरांचा व येथील काही व्यावसायिकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणासाठी बंद करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील एकतानगरीमधल्या २ सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरले असून येथील १५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंड करण्यात आला आहे.

अजित पावर यांचे यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यात मुसळधार पाऊस झाल्याने यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अजित पवार यांनी या बाबत ट्विट देखील केले आहे. अजित पावर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणातून सध्या २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशीतून २७ हजार ६०९ क्युसेक्स, पवनातून ५ हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून ८ हजार ५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानेही पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. यासंदर्भात मी पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिचवडचे महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली असून त्यांना नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना, कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यकता भासल्यास एनडीआरएफ ची मदत घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांना संपूर्ण मदत, सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

एकता नगर येथील रहिवाशांना शेल्टर होममध्ये जाण्याच्या सूचना

एकता नगरी आणि परिसरातील नागरिकांना महापालिकेने नोटीस दिली असून सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. सखल सखल भागात पुन्हा पाणी भरण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने, नागरिकांना शेल्टर होममध्ये जावे अशा सूचना देखील पुणे महापालिकेने केल्या आहेत. पार्किंगमध्ये असलेली वाहने सुरक्षित स्थळी हलवावे असे देखील सांगण्यात आले आहे.

 

विभाग