मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यातील आणखी एका बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांना २० हजार रुपयेच काढता येणार

राज्यातील आणखी एका बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांना २० हजार रुपयेच काढता येणार

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 25, 2022 07:53 AM IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील ४ बँकांवर निर्बंध लादले असून त्यात महाराष्ट्रातील एका बँकेचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (फोटो - रॉयटर्स)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चार बँकांवर बंदी घातली आहे. यामध्ये बँकांच्या व्यवहारांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेनं संबंधित बँकांमधून आता मर्यादित रक्कम काढता येईल असं म्हटलं आहे. देशातील चार बँकांपैकी एक बँक महाराष्ट्रातील (Maharashtra) आहे. बँकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्यानं रिझर्व्ह बँकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये लातूरच्या साईबाबा जनता सहकारी बँकेचा (Saibaba Janta Sahkari Bank) समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने साईबाबा जनता सहकारी बँक , द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सुरी (पश्चिम बंगाल) आणि नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., बहराइच या बँकांवर निर्बंध लादले आहेत. यात साईबाबा जनता सहकारी बँकेच्या ठेवीदारांना २० हजारांहून जास्त रक्कम काढता येणार नाही.

बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९ अंतर्गत रिझर्व्ह बँकेने चारही बँकांना सूचना दिल्या आहेत. तसंच चारही बँकांवर लादण्यात आलेले निर्बंध हे पुढचे सहा महिने लागू असणार आहेत. याशिवाय सूर्योदस स्मॉल फायनान्स बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. नियम आणि मापदंडाचे उल्लंघन केल्यानं ही कारवाई केली असून बँकेला ५७.७५ लाख रुपये दंड करण्याता आला आहे.

याआधी महाराष्ट्रातील रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. यात बँकेच्या ग्राहकांना जास्ती जास्त १५ हजार रुपये खात्यातून काढता येणार आहेत. तसंच बँकेला नवीन कर्ज मंजुरी देता येणार नाही. शिवाय ठेवीदारांनी नव्या ठेवीही ठेवता येणार नाहीत. जुन्या कर्जाचे नुतनीकरण, नवी गुंतवणूक यावर सुद्धा निर्बंध घातले गेले आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग