मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rupee Bank : RBI चा मोठा दणका, पुण्याच्या रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द

Rupee Bank : RBI चा मोठा दणका, पुण्याच्या रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 10, 2022 07:33 PM IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कचाट्यात महाराष्ट्रातील आणखी एक मोठी सहकारी बँक सापडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे.

रुपी बँकेचा बँकिंग परवाना रद्द
रुपी बँकेचा बँकिंग परवाना रद्द

पुणे - बँकेचे चालू राहणे हे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी चांगलं नाहीय. सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक तिच्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही, असं निरीक्षण नोंदवण भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) पुण्यातील रुपी बँकेचा (rupee co operative bank ) परवाना रद्द केला आहे. या कारवाईमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कचाट्यात महाराष्ट्रातील आणखी एक मोठी सहकारी बँक सापडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने  रुपी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेचा हा आदेश आजपासून सहा आठवड्यांनंतर म्हणजेच २२ सप्टेंबर २०२२ पासून लागू होईल. 

संबंधित आदेशानंतर बँकेच्या वरिष्ठांना, सहकार आयुक्त, सहकारी संस्थांचे निबंधक यांना बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केल्यानुसार बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच कमाईचं योग्य साधन नाही किंवा कमाईच्या शक्यता नाहीत. त्यामुळे, ते बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ५६ सह कलम ११(१) आणि कलम २२ (३) (ड) च्या तरतुदींचे पालन झालेलं नाही, असं निरीक्षण नोंदवले आहे. 

बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे, 'रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे'ला 'बँकिंग'चा व्यवसाय करण्यास मनाई आहे ज्यात, इतर गोष्टींबरोबरच, कलम ५ (ब) मध्ये परिभाषित केल्यानुसार ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे समाविष्ट आहे. २२ सप्टेंबर २०२२ पासून बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ५६ नुसार ही बंदी असेल, असं आरबीआयने म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग