मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ravindra Waikar : जोगेश्वरी जमीन घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांची क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

Ravindra Waikar : जोगेश्वरी जमीन घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांची क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

Jul 06, 2024 09:48 AM IST

Ravindra Waikar news : मुंबईतील बहुचर्चित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी दिलासा दिला आहे. त्यांना या प्रकरणी क्लीन चीट देण्यात आली असून त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

जोगेश्वरी जमिन घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे
जोगेश्वरी जमिन घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे (PTI)

Ravindra Waikar news : रवींद्र वायकर यांच्यावर आरोप असलेल्या तब्बल ५०० कोटी रुपयांच्या जोगेश्वरी येथील हॉटेल भूखंड घोटाळ्याची चौकशी मुंबई पोलिसांनी बंद केली आहे. या प्रकरणी वायकर यांना क्लीन चिट देण्यात आली असून त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट शुक्रवारी न्यायालयात सादर केला आहे. या घोटाळ्यात वायकर यांचा सहभाग नसल्याचे पुढे आले असल्याचे या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आले आहे. यामुळे वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई येथील जोगेश्वरी येथील एका भूखंडी खरेदी व्यवहारात गैर व्यवहार झाल्याचे आरोप करून या प्रकरणी रवींद्र वायकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा व त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ईओडब्लु कोर्टात शुक्रवारी सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. या प्रलकरणी गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच या प्रकरणी वायकर यांच्यावर असलेले सर्व गुन्हे देखील मागे घेण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर मोठे हॉटेल बांधण्यात येणार होते. या प्रकरणी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा रवींद्र वायकर यांनी केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पालिकेचा ओठ महसूल बुडवला असून त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी देखील सोमय्या यांनी केली होती. त्यानुसार पालिकेले या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. पालिका अभियंता संतोष मांडवकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी अटकपूर्व जामीन वायकर यांना मंजूर झाला होता. तर त्यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेळा चौकशी देखील केली होती. यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. त्यांच्या निवडीवरून देखील मोठा गोंधळ झालह ओत. दरम्यान, आता त्यांच्यावरील भूखंड घोटाळ्याच्या आरोपातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला असून या प्रकरणी त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर