वायकर प्रकरणाचा वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल, कारण काय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वायकर प्रकरणाचा वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल, कारण काय?

वायकर प्रकरणाचा वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल, कारण काय?

Jun 17, 2024 11:55 PM IST

Ravindra vaikar evm dispute : मतमोजणीवेळी आमदार पोतनिस यांनी सशस्त्र पोलीस अंगरक्षकासह विनापरवानगी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालाचा वाद चांगलाच पेटला आहे. या मतदार संघातीलनिकाल संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने करत मतमोजणीच्या १९ व्या फेरीनंतर गडबड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या निकालाविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला असून १९व्या फेरीनंतर ६५० मतांचा फरक पडत असल्याचा दावा अनिल परबांनी केला आहे. त्यातच आता निकालाबाबत होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रविंद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या आमदाराविरोधातही तक्रार दाखल केली आहे.

वायकर यांच्या मेहुण्याकडे आणि मुलीने मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यावरून मोठा वाद झाला होता. त्याचबरोबर ईव्हीएम अनलॉक करण्याचा ओटीपी वायकरांच्या मेहुण्याच्या मोबाईलवर आल्याचा आरोप केला जात असताना त्या वादाचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. आता वायकरांकडून ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई उत्तर-पश्चिममध्ये मतमोजणीत काय घोळ झाला? आयोगाला थेट इशारा देत ठाकरे गटानं सगळं सांगितलं

मतमोजणीवेळी आमदार पोतनिस यांनी सशस्त्र पोलीस अंगरक्षकासह विनापरवानगी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला होता. ठाकरे गट निकालावर अनेक आक्षेप घेत असल्याने आता वायकरांनीही यावर आक्षेप घेतला असून त्यांच्या तक्रारीवरून वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मतमोजणी केंद्रातनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्रअसलेल्यांनाच प्रवेश दिला जात होता. मात्रपोतनिस यांच्याकडे तसे कोणतेही ओळखपत्रनसताना तेसायंकाळी ४ ते रात्री ८पर्यंत मतमोजणी केंद्रात हजर होते.त्यांच्यासोबत अमोल किर्तीकर देखील होते, अशी तक्रार वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. यानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

१९ व्या फेरीनंतर मतमोजणीतील पारदर्शकता संपली. आम्हाला माहिती न देताच निकाल जाहीर केला गेला. रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला जात होत्या. त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते? सीसीटीव्ही फुटेज देण्यासविलंक का?या प्रकरणात १० दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. १० दिवसात मोबाईल बदलले गेल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. रिटर्निंग ऑफिसरचा इतिहास तपासून बघा. त्याच्याविरोधात किती गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घ्या. त्यांना किती वेळा निलंबित केले आहे, ते तपासा असे आक्षेप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले आहेत.

 

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, जर निवडणूक यंत्रणा भाजपच्या हातात नसती व पारदर्शकपणे प्रक्रिया राबवली असती तर भाजपाला २४० काय ४० जागाही मिळाल्या नसत्या. वायकरांचा विजय घोषित करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर