कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली.२००९ आणि २०१४ च्या कसबा विधानसभा निवडणुकीतगिरीश बापट यांच्या विरोधातरविंद्र धंगेकररिंगणात होते. त्यांनी बापटांनी चांगली लढत दिली होती. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले होते. मात्र कसब्यात भाजप उमेदवारहेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर धंगेकरांनीमागील अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
या भेटीनंतर धंगेकर म्हणाले की, खासदार गिरीशभाऊ बापट यांची आज भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. कसबा मतदारसंघाचे आजवर गिरीश भाऊंनी सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे ते सार्वजनिक राजकारणात जास्त सक्रिय नसले तरी कसब्यातील महत्त्वाच्या प्रश्नाबाबत गिरीशभाऊंचे मार्गदर्शन मी नक्कीच घेईल. राजकीय विरोध हा केवळ निवडणुकीपुरता असावा इतर वेळी सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करावे, असा माझा अगोदर पासूनच प्रयत्न असल्याने निश्चितच कसबा पेठेच्या राजकारणात या पुढील काळात सर्वसमावेशक राजकारणाची परंपरा जपली जाईल.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीजवळपास ११ हजार मतांनी विजय मिळवून भाजपचा गड धुळीस मिळवला. विजयी झाल्यानंतरधंगेकर यांनीगुरुवारी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी शैलेश टिळक,कुणाल टिळक यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. तर आज भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या.