निवृत्ती का घेतली आणि निवृत्त का होत नाही? यात जमीन आसमानचा फरक; आर अश्विन असं का म्हणाला?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  निवृत्ती का घेतली आणि निवृत्त का होत नाही? यात जमीन आसमानचा फरक; आर अश्विन असं का म्हणाला?

निवृत्ती का घेतली आणि निवृत्त का होत नाही? यात जमीन आसमानचा फरक; आर अश्विन असं का म्हणाला?

Jan 15, 2025 09:18 AM IST

Ravichandran Ashwin: बॉर्डर- गावस्कर मालिकेदरम्यान रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. यावर अश्विनने स्पष्टीकरण दिले आहे.

निवृत्ती का घेतली? आणि निवृत्त का होत नाही? यात जमीन आसमानचा फरक; आर अश्विन असं का म्हणाला?
निवृत्ती का घेतली? आणि निवृत्त का होत नाही? यात जमीन आसमानचा फरक; आर अश्विन असं का म्हणाला? (AP)

Ravichandran Ashwin Retirement: टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विनने निवृत्तीची घोषणा केली. मात्र, मालिकेच्या मधोमध त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. मात्र, त्यावेळी निवृत्तीचा निर्णय का घेतला? याबाबत रविचंद्रन अश्विन मोकळेपणाने बोलला आहे.

आता रविचंद्रन अश्विनने स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवर निवृत्तीबद्दल सांगितले की, ‘माझ्यात अजूनही क्रिकेट खेळण्याची क्षमता होती. पण निवत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यामागचे कारण म्हणजे, लोक तुम्हाला निवृत्त का होत नाही? असा प्रश्न करण्याऐवजी निवृत्त का झाला? असे विचारतात, हे नेहमीच चांगले असते.’ अश्विनने असेही सांगितले की तो बीजीटीबद्दल जास्त बोलत नव्हता कारण तो स्वत: काही काळापूर्वीपर्यंत त्या संघाचा भाग होता. अशा परिस्थितीत त्याला आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करायचे नव्हते.

आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी तो अजूनही आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्जने मोठ्या रकमेत विकत घेतले. याशिवाय, तो क्लब क्रिकेटही खेळू शकतात. मात्र, जोपर्यंत तो भारतीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाही, तोपर्यंत तो निवृत्त खेळाडूंच्या लीगमध्ये खेळणार नाही.

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

अश्विनची कसोटी कारकीर्द अत्यंत चमकदार राहिली आहे. त्याने १०६ कसोटी सामन्यात ५३७ विकेट्स घेतल्या. या काळात त्याने फलंदाजीनेही शानदार कामगिरी केली आणि ६ शतके आणि १४ अर्धशतकांसह एकूण ३५०३ धावा केल्या. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या १२४ धावा आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अश्विनने टीम इंडियासाठी ११६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५६ आणि ६५ टी-२० सामन्यांमध्ये ७२ विकेट्स घेतल्या आहेत.

सर्वोत्तम कामगिरी

अश्विनची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका कसोटी डावात ५९ धावा देऊन ७ बळी विकेट्स घेतल्या होत्या. अश्विनने एकूण ११ वेळा कसोटीत मालिकावीराचा किताब जिंकला आहे. कसोटीत सर्वाधिक पाच विकेट्स घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. त्याने कसोटी सामन्यात एकूण ३७ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर कुंबळेचा क्रमांक लागतो, ज्याने कसोटीत एका डावात ३५ वेळा पाच विकेट्स घेतले. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३५० बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने फक्त ६६ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. अश्विन २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या