मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुरुंगातून सुटल्यानंतर रवी राणा पहिल्यांदाच बोलले, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…

तुरुंगातून सुटल्यानंतर रवी राणा पहिल्यांदाच बोलले, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 06, 2022 03:29 PM IST

तब्बल १२ दिवसांनंतर कोठडीतून सुटलेल्या रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.

रवी राणा
रवी राणा (Vijay Shankar Bate)

राजद्रोहाच्या आरोपाखाली १२ दिवस कोठडीत असलेले आमदार रवी राणा (Ravi Rana) व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची गुरुवारी अखेर सुटका झाली. त्यानंतर रवी राणा यांनी आज प्रथमच मीडियाशी संवाद साधला. न्यायालयानं घातलेल्या अटींमुळं त्यांनी संबंधित प्रकरणावर फार काही बोलणं टाळलं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

खासदार नवनीत राणा या सध्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या भेटीनंतर रुग्णालयाबाहेर पडलेल्या रवी राणा यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला व संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर, ‘आमच्यावर सूडबुद्धीनं कारवाई झाली आहे. महाराष्ट्रात अशी दडपशाही कधीच नव्हती. जनता सगळं काही पाहत आहे, असं रवी राणा म्हणाले. ‘महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे. या राज्यात एका महिलेला चुकीची वागणूक दिली गेली. सहा दिवसांआधी नवनीत राणा यांची तब्येत बिघडली होती. पण त्यांना उपचार दिले गेले नाहीत. त्यांना त्रास देण्यात आला. त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. तुरुंग प्रशासन हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. तुरुंग प्रशासनानं मुख्यमंत्र्याच्या आदेशानं नवनीत यांना त्रास दिला,' असा आरोप रवी राणा यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी आता तरी ऑफलाइन व्हावे!

रवी राणा यांनी राज्य सरकारच्या कारभारावरूनही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. राज्यात अनेक प्रश्न आहेत. विजेचा प्रश्न आहे. खतांचे, बी-बियाण्यांच्या अडचणी आहेत. आता शाळा देखील ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री अजूनही ऑनलाइन आहेत. ऑनलाइन बैठका घेऊन आदेश देत आहेत. राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही, असा प्रश्न लोकांना पडला आहे, असा टोलाही रवी राणा यांनी यावेळी हाणला.

बीएमसीची कारवाई राजकीय

राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची नोटीस मुंबई महापालिकेनं बजावली आहे. त्यावरही रवी राणा यांनी संताप व्यक्त केला. 'राजकीय सूडबुद्धीनं महापालिका ही कारवाई करत आहे. महापालिकेच्या पथकानं दोनदा आमच्या घरावर नोटीस दिली आहे. १५ वर्षांपूर्वीची ही इमारत आहे. त्यावेळी विकासकाला मंजुरी दिली होती. आता अचानक महापालिकेला अनधिकृत काय दिसलं, असा सवाल त्यांनी केला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग