Ration Card e KYC : सध्या शासकीय योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना ई केवायसी (Ration Card e KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मग आधार असो, बँकेचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्डसाठीही ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी असलेली १ नोव्हेंबरची अंतिम मुदत वाढवून १ डिसेंबर २०२४ करण्यात आली आहे.
सरकारने काही महिन्यांपूर्वी केसरी, पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्वे लागू केली होती. त्यात सर्व रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी आता शेवटची तारीख १ डिसेंबर २०२४ असणार आहे.
प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास संबंधितांना धान्य वितरण सेवेचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
जर तुम्ही अजूनही तुमच्या रेशनकार्डाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर, तुमच्या परिसरात असलेल्या कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन फोर-जी ईपॉस (pos) मशीनने ई-केवायसी करुन घेवू शकता, अन्यथा तुम्हाला रेशनकार्डावरुन कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही.
नुकतीच सरकारने ई-केवायसी केलेल्यांनाच रेशन मिळणार असल्याची घोषणा केली होती. केवायसीची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. मात्र नंतर ती १ नोब्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता मात्र अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. १ डिसेंबरपर्यंत तुम्ही ई-केवायसी न केसल्यास तुम्हाला रेशन मिळणार नाही. तसेच रेशनकार्डामधून तुमची नावे काढून टाकली जावू शकतात.