टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. उद्योग क्षेत्रापासून ते राजकारण, क्रीडा क्षेत्रापर्यंत अनेक दिग्गज रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, रतन टाटा यांचे विश्वासू आणि त्यांची सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या शंतनू नायडू यांनी आपल्या गुरूसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये रतन टाटा आणि शंतनू यांच्यातील घट्ट मैत्री दिसून येते.
नायडू यांनी रतन टाटा यांच्या सोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "या मैत्रीने माझ्यात जी पोकळी निर्माण केली आहे, ती भरून काढण्यासाठी मी माझे उर्वरित आयुष्य घालवणार आहे. दु:ख प्रेमासाठी चुकवावी लागणारी किंमत आहे अलविदा, माझ्या प्रिय दीपस्तंभ.
रतन टाटा यांचे पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हॉलमध्ये ठेवले होते. रतन टाटा यांचे पार्थिव शरीर रुग्णालयातून नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हॉलपर्यंत आणताना या प्रवासात सर्वात पुढे शंततु नायडू दिसले.
पाणावलेल्या डोळ्यांनी शंतनु नायडू बाइकवरून रतन टाटा यांच्या अंत्येयात्रेत सर्वात पुढे होते. त्यांनी सकाळीच एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती.
३० वर्षीय शंतनू नायडू हा मुंबईचा रहिवासी आहे. शंतनू नायडू हा एक भाग्यवान तरुण आहे ज्यावर रतन टाटांचा खूप प्रभाव होता. शंतनू हे टाटा ट्रस्टचे सर्वात तरुण महाव्यवस्थापक आणि रतन टाटा यांचे दीर्घकाळ सहाय्यक होते. टाटा समूहाला जागतिक महासत्ता बनवणाऱ्या टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. शंतनू नायडू आणि रतन टाटा यांच्यातील अनोखी मैत्री प्राण्यांवरील परस्पर स्नेहामुळे फुलली. २०१४ मध्ये नायडू यांनी रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक अपघातांपासून भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी रिफ्लेक्टिव्ह कॉलर तयार केले होते. रतन टाटा यांनी त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि नायडू यांना आपल्या टीममध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. गेल्या दहा वर्षांत शंतनू नायडू हे रतन टाटा यांचे जवळचे आणि विश्वासू मित्र बनले.
२०१४ पासूनरतन टाटांसोबत होते शंतनू -
सप्टेंबर २०२२ मध्ये गुडफेलो लाँच केले होते. या स्टार्टअपची सुरुवात करणारे शंतनु नायडू३० वर्षांचे आहेत. त्यांनी कॉर्नेल यूनिवर्सिटी (Cornell University) मधून शिक्षण घेतले आहे. तेटाटा ऑफिसमध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर २०१४ पासून ते रतन टाटा यांच्यासोबत आहेत.
इंडस्ट्रीमध्ये शंतनु यांचे मोठे नाव -
वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी शंतून यांनी उद्योग क्षेत्रात असे स्थान मिळवले आहे, जे अनेक लोकांचे स्वप्न असते. शंतनू नायडू रतन टाटा यांना स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत होते. शंतनु नायडूचा जन्म १९९३ मध्ये पुण्यात झाला होता. ते एक फेमस बिझनेसमन, इंजीनियर, जूनियर असिस्टेंट, डीजीएम, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, लेखक आणि इंटरप्रेन्योर आहे. त्याचबरोबर ते टाटा ट्रस्टमध्ये डिप्टी जनरल मॅनेजरही होते.
पशुप्रेम आणि समाज सेवेची भावना मनात ठेवणाऱ्या शंतनू यांनी “मोटोपॉज” नावाची संस्था स्थापन केली असून ही संस्था रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना मदत करते. नायडू यांच्या नेतृत्वात मोटोपॉज संस्थेचा ८ महिन्यात १७ शहरात विस्तार झाला असून २५० कर्मचारीकाम करतात.