jamsetji tata donated more than 8 lakh crore : भारतातल्या श्रीमंतांबद्दल बोलायचं झालं तर मुकेश अंबानी, स्वर्गीय रतन टाटा, अझीम प्रेमजी यांच्यासारख्या लोकांची नावं घेतली जातात. मात्र, भारतातील श्रीमंतांमधील सर्वात मोठ्या दानशूराबद्दल बोल्याचं झाल्यास ही नावे मागे पडतील. भारतातील सर्वाधिक दानशूर उद्योगपती बाबत बोलायचे झाल्यास तर एकाच व्यक्तिचं नाव पुढं येत. या उद्योगपतीसोबत रतन टाटा यांचं जवळचं नातं होत.
हा दानशूर उद्योगपती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाही तर टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे होते. त्यांनी आपल्या हयातीत तब्बल ८.२९ लाख कोटी रुपयांची देणगी दिली. जी आजच्या श्रीमंतांच्या देणग्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. जमशेदजी टाटा यांना भारतातील उद्योगधंद्यांचे जनक म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी झाला.
२०२१ च्या एडेलगिव्ह हुरुन परोपकार अहवालानुसार टाटांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात देशाच्या प्रगतीसाठी भरवी काम केले. कोट्यवधी देशवासीयांचे भवितव्य बदलून टाकणाऱ्या संस्था त्यांनी निर्माण केल्या. जमशेदजी टाटा यांनी १८६८ मध्ये टाटा समूहाची स्थापना केली. आज टाटा इंडस्ट्रीजची उलाढाल २४ लाख कोटींहून अधिक आहे.
गुजरातमधील पारशी कुटुंबातील जमशेदजी टाटा यांनी परोपकाराची संस्कृती सुरू केली. पुढे त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतनजी टाटा यांनीही त्यांचा वारसा पुढे नेला. त्याचा व्यवसायही वाढला. त्याचबरोबर दान करण्यात आणि समाजहिताचे काम करण्यात टाटा समूह कधीही मागे राहिलेला नाही.
दरल नुसरवानजी टाटा हे पारशी पुजारी होते आणि त्यांनी टाटा समूहाचा पाया तयार केला. जीवनबाई कवसजी टाटा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना जमशेदजी टाटा, रतनबाई टाटा, मानेकबाई टाटा, वीरबाईजी टाटा अशी पाच मुले झाली. जमशेदजी टाटा यांचा विवाह हिराबाई डडब्बू यांच्याशी झाला. त्यांना दोराबजी टाटा ही तीन मुले होती. धुनबाई टाटा आणि सर रतनजी टाटा. दोराबजी टाटा यांच्या निधनानंतर रतनजी टाटा यांनी टाटा समूहाची सूत्रे हाती घेतली.
रतनजी टाटा आणि फ्रेंच महिला सुझान यांचे चिरंजीव जेआरडी टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष होते. यानंतर रतनजी टाटा यांनी नवल टाटा यांना दत्तक घेतले. नवल टाटा यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या एका पत्नी पासून त्यांना दोन मुळे झाली. यातील एक होते रतन टाटा आणि जिमी टाटा. तर दुसऱ्या पत्नी पासून त्यांना नोएल टाटा यांचा जन्म झाला. ते रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. नोएल टाटा आता टाटा समूहाचे अध्यक्ष होऊ शकतात.
संबंधित बातम्या