उद्योगपती रतन टाटा यांच्यावर मुंबईतील वरळी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. वरळीतील स्मशानभूमीत रतन टाटा पंचतत्वात विलीन झाले. कुलाबा येथील टाटा यांच्या निवासस्थानापासून NCPA पर्यंत लोकांच्या रांगा पाहायला मिळत होत्या.त्यांच्या अंतिम दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून राजकीय नेते, उद्योजक, क्रीडा, मनोरंजन जगतातील अनेक दिग्गज पोहोचले होते. बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले होते.
महाराष्ट्र आणि झारखंड व गुजरात सरकारने टाटांच्या निधनानंतर एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. टाटा कुटूंबाने एका निवेदनात म्हटले की,‘आम्ही त्यांचे भाऊ, बहीण व कुटूंबीय,सर्व लोकांकडून मिळालेल्याप्रेम व सम्मानाने भारावून गेलो आहे. आता रतन टाटा आपल्यामध्ये राहिले नाहीत. मात्र त्यांची विनम्रता,उदारता आणि विचारांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहिल. टाटा सन्सचे चेयरमन एन चंद्रशेखरन यांना म्हटले की, आम्ही एक मित्र व मार्गदर्शक गमावला.
मुंबई पोलिसांना त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. मुंबईतील शवदाहिनीत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यावेळी उपस्थित होते.
भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टाटांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण देशातून आणि जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली.टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी बुधवार ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी साडे वाच वाजण्याच्या सुमारास वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक मित्रपरिवार आणि सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.
रतन टाटा यांना मानवंदना देण्यासाठी आलेलेव्हीआयपीगेल्यावर तेथे प्रचंड जनसमुदाय दाखल झाला. त्यामुळे स्मशानभूमीत गर्दी झाली. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले. कम्युनिटी हॉलमध्ये सामुहिक प्रार्थना झाल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.
रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी NCPA येथे ठेवण्यात आलं होतं. दुपारी ४ चा सुमारास रतन टाटांच्या अंत्ययात्रेला NCPA तून सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्याकडून रतन टाटा यांच्या अंत्ययात्रा आणि अंत्यविधींचे नियोजन केलं होतं. माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर संध्या ५ वाजता अंत्यसंस्कार केले गेले. तत्पूर्वी महापालिकेकडून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी रतन टाटांना निरोप देण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली होती. मुंबईत पावसाची शक्यता असल्यानं वॉटरप्रुफ मंडपही पालिकेकडून उभारला होता.
संबंधित बातम्या