मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur University : नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी निलंबित, काय आहे प्रकरण?

Nagpur University : नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी निलंबित, काय आहे प्रकरण?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 21, 2024 11:25 PM IST

Nagpur University VC Suspend : नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरीयांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे.

vice chancellor subhash chaudhary suspend
vice chancellor subhash chaudhary suspend

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे. राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी ही कारवाई केली आहे. चौधरी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकृत पत्र राज्यपाल कार्यालयातून विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविण्यात आले आहे.

 कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याविरोधात राज्यपाल कार्यालयाकडे अनेक तक्रारी आल्या  होत्या. राज्यपालांनी या तक्रारींवर बाजू मांडण्यासाठी बुधवार २१ फेब्रुवारीला कुलगुरूंना बोलावले होते. मात्र, डॉ. चौधरींच्या उत्तराने राज्यपाल कार्यालयाचे समाधान न झाल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे. कुलगुरू पदाचा प्रभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

डॉ. चौधरी यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीसाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या  अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल राज्यपालांना सादर केला होता. या अहवालात कुलगुरूंकडून अधिकारांचा दुरुपयोग झाल्याचे, ‘एमकेसीएल’संदर्भात सरकारचे आदेश डावलल्याचे आरोप करण्यात आले होते. 

परीक्षेच्या कामात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितची (एमकेसीएल) निवड आणि विनानिविदा बांधकामांचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आले होते. ‘एमकेसीएल’ सोबत विद्यापीठाने केलेला करार २०१५ मध्ये रद्द करण्यात आला होता. सप्टेंबर २०१७ मध्ये राज्य शासनाने विद्यापीठाला पत्र पाठवून ‘एमकेसीएल’ ला कोणतेही काम थेट देऊ नये असे पत्र दिले होते. असे असतानाही विद्यापीठाने शासन निर्णय डावलत ‘एमकेसीएल’ला कंत्राट दिल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला होता.

IPL_Entry_Point