मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन; रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभीनाका देवीची आरती

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन; रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभीनाका देवीची आरती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 29, 2022 07:38 PM IST

रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचागड (Eknath Shinde's bastion) मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील टेंभीनाका (Tembhi Naka) देवीची आरती केली. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभीनाका देवीची आरती
रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभीनाका देवीची आरती

ठाणे – शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून शिवसेनेत ठाकरे गट व शिंदे गटामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटातील संघर्ष टोकदार झाला असताना रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचागड (Eknath Shinde's bastion) मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील टेंभीनाका (Tembhi Naka) देवीची आरती केली. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

यावेळी महिला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या दरम्यानशिंदे गटाकडून रात्री ८ वाजता आरती केली जाणार असल्यानेठाकरे गट आणि शिंदे गट यांचा सामना टळला.

रश्मी ठाकरे या टेंभीनाक्याच्या देवीच्या आरतीसाठी येणार असल्याने येथे शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये महिला शिवसैनिकांची संख्या अधिक होती. रश्मी ठाकरे यांनी प्रथम आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर देवीच्या गाभाऱ्यात जाऊन त्यांनी देवीची आरती केली.

दिवंगतआनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका देवीचा नवरात्रोत्सव यंदा चांगलाच चर्चेत आला आहे. या देवीची आरती कोण करणार यावरुन वाद रंगला होता. त्यामुळे देवीच्या आरतीवरुन ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा समोरासमोर येणार का, असा सवालही विचारला जात होता. आता रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली आहे. तर शिंदे गटाकडून रात्री ८ वाजता आरती करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाचा सामना टळला.

रश्मी ठाकरेंच्या या भेटीवेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.रश्मी ठाकरे यांच्यासोबत यावेळी नगरसेविका नंदिनी विचारे आणि ठाण्यातील शिवसेना नेत्या अनिता बिरजे उपस्थित होत्या. त्यांनीही देवीच्या आरतीत भाग घेतला.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या