मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rashmi Thackeray: रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची एकनाथ शिंदेंसोबत पहाटे झाली गुप्त भेट? सत्य काय?

Rashmi Thackeray: रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची एकनाथ शिंदेंसोबत पहाटे झाली गुप्त भेट? सत्य काय?

Haaris Rahim Shaikh HT Marathi
May 05, 2023 05:54 PM IST

Rashmi Thackeray-Eknath Shinde meet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले आहे.

Rashmi Thackeray never met me: CM Eknath Shinde
Rashmi Thackeray never met me: CM Eknath Shinde

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत २ मे रोजी गुप्त भेट झाल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे म्हटले जाते. मात्र, या भेटीच्या वृत्ताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ‘श्रीमती रश्मी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवाशी माझी भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही भेट झालेली नाही.’ असं स्पष्टीकरण खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिलं आहे.

IPL_Entry_Point