Rashmi Shukla: ‘फोन टॅपिंग’ प्रकरण कायमचं बंद; रश्मी शुक्ला यांना दिलासा, कोर्टाने स्वीकारला क्लोजर रिपोर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rashmi Shukla: ‘फोन टॅपिंग’ प्रकरण कायमचं बंद; रश्मी शुक्ला यांना दिलासा, कोर्टाने स्वीकारला क्लोजर रिपोर्ट

Rashmi Shukla: ‘फोन टॅपिंग’ प्रकरण कायमचं बंद; रश्मी शुक्ला यांना दिलासा, कोर्टाने स्वीकारला क्लोजर रिपोर्ट

Aug 23, 2023 11:48 AM IST

Rashmi Shukla Phone Tapping case : महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे फोन टॅपिंग प्रकरण आता पूर्णपणे बंद झाले आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे.

Rashmi Shukla
Rashmi Shukla

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे फोन टॅपिंग प्रकरण आता पूर्णपणे बंद झाले आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे. यामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असताना २०१९ साली महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला न्यायालयाने स्वीकारले. यामुळे या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे.

Chandrayaan 3 : चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला साकडे; महाअभिषेक घालत केली प्रार्थना

राज्यात प्रचंड गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना सशस्त्र सीमा दलच्या महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आला होता. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता.

काय आहे फोन टॅपिंग प्रकरण ?

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवालदेखील वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर