मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणी वादात अडकलेल्या रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणी वादात अडकलेल्या रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 30, 2023 10:04 AM IST

Rashmi Shukla new DGP of Maharashtra : फोन टॅपिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदी वर्णी लागली आहे.

Rashmi Shukla
Rashmi Shukla

Rashmi Shukla new DGP of Maharashtra : आयपीएस अधिकारी तसेच पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदी वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kolhapur Murder: शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेला संपवलं! नंतर ऊसाच्या फडात टाकून पेटवलं, कोल्हापुरात हत्याकांड उघड

केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी (दि २९) या संदर्भात बैठक घेतली होती. राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवण्यात आली होती. यात रश्मी शुक्ला यांचे देखील नाव होते. दरम्यान, त्यांना महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली जाणार या बाबत संभ्रम होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. मुंबईचे महासंचालक रजनीश शेठ हे निवृत्त झाले असून त्यांच्या जागी आता रश्मी शुक्ला या नव्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

फोन टॅपिंग प्रकरणी वादग्रस्त ठरल्या होत्या रश्मी शुक्ला

रश्मी शुक्ला या पुणे पोलिस आयुक्त असतांना वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे फोन फोन टॅप केल्याचा तयांच्यावर आरोप होता. या प्रकरणी तयांच्यावर गुन्हा देखील दाखल करत चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पडल्यावर त्यांच्यावरील चौकशी थांबवण्यात आली होती. एवढेच नाही पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात 'क्लोजर रिपोर्ट' देखील सादर करत त्यांना निर्दोष मुक्त केले होते.

IPL_Entry_Point

विभाग