Pune rape crime : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असतांना आता पुण्यात देखील एक अशीच घटना उघडकीस आली आहे. एका विद्यार्थिनीला तिच्या मैत्रिणीने दारू पाजून तिच्यावर तिच्या मित्रांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या मैत्रीणीसह दोन अल्पवयीन मुलांवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी नाना पेठ येथील पेट्रोल पंप, वानवडीतील हेवन पार्क, काळेपडळ येथील आरोपीच्या घरी घडली. याबाबत या मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेचे वृत्त असे की पीडित मुलगी ही १३ वर्षांची आहे. पीडित मुलीशी एका मुलाशी ओळख होती. त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलीच्या मैत्रिणीने तिला फूस लावून तिला रिक्षात बसवून तिला दारु पाजली. यावेळी तिने पीडितेला आरोपीच्या वानवडी येथील घरी नेले. पीडित मुलगी ही दारुच्या नशेत असताना एका आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तर दुसऱ्याने दोघांचा व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड केला. पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितला. यावेळी पालकांनी समर्थ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. यानंतर या प्रकरणी चौघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड तपास करत आहेत.
पुण्यातील भवानी पेठ येथील एका बड्या शाळेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. १५ ऑगस्टच्या दिवशी ही घटना घडली. पीडित मुलगी ७ वीत आहे तर आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. देवराज पदम आग्री (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.
वारजे भागात एका मुलीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी अवि कालीदास पोपळघट (वय २०, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी) याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पीडित मुलीने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची व आरोपी ओळख होती. आरोपीने मुलीला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर मुलीवर त्याने बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती समजली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली