अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका मृत व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (१) (बलात्कार) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरमध्ये मात्र आरोपीच्या मृत्यूची वेळ आणि परिस्थिती नमूद करण्यात आलेली नाही. आरोपीने मुंब्रा येथील आपल्या शेजारच्या १७ वर्षीय मुलीशी मैत्री केली आणि जून ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
त्यानंतर घरच्यांचा विरोध असतानाही आरोपीने मुलीशी लग्न केले. मुलगी गरोदर राहिली आणि १४ फेब्रुवारीला तिने मुलाला जन्म दिला. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर वसई-विरार परिसरात एका १७ वर्षीय मुलीचे खासगी फोटो व्हायरल करून तिचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज सिंग (२२) याने गेल्या वर्षी मुलीशी मैत्री केली होती आणि तिला तिचे नग्न फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवण्यास भाग पाडले होते.
जेव्हा तिने तिचा न्यूड व्हिडिओ पाठवण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने मुलीचा आक्षेपार्ह फोटो तिच्या मित्रांना पाठवून तिची बदनामी केली.
संबंधित बातम्या