Mumbra Crime News : ठाण्यातील मुंब्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला. या तरुणाचा मृत्यू झाला असून पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (१) (बलात्कार) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरमध्ये आरोपीच्या मृत्यूची वेळ आणि परिस्थिती नमूद करण्यात आलेली नाही. आरोपीने मुंब्रा येथील आपल्या शेजारच्या १७ वर्षीय मुलीशी मैत्री केली. जून ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्याने मुलीच्या घरच्यांचा विरोध असतानाही पीडित मुलीशी लग्न केले. दरम्यान, मुलगी गरोदर राहिली आणि १४ फेब्रुवारीला एका मुलाला जन्म दिला. मात्र, या दरम्यान, मुलाचा मृत्यू झाला. यामुळे मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर वसई-विरार परिसरात एका १७ वर्षीय मुलीचे खासगी फोटो व्हायरल करून तिचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज सिंग (वय २२) याने गेल्या वर्षी मुलीशी मैत्री केली होती आणि तिचे नग्न फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवण्यासाठी त्याने भाग पाडले होते. यानंतर आरोपीने तिचा व्हिडिओ पाठवण्याची देखील मागणी केली होती. मात्र, पीडित तरुणीने तिचा न्यूड व्हिडिओ पाठवण्यास नकार दिला. यामुळे आरोपीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आरोपीने मुलीचा आक्षेपार्ह फोटो त्याच्या तिच्या मित्रांना पाठवून तिची बदनामी केली. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेल.
संबंधित बातम्या