मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नथुराम गोडसेच्या गोळीने गांधींची हत्या झाली नाही, रणजीत सावरकरांचा खळबळजनक दावा

नथुराम गोडसेच्या गोळीने गांधींची हत्या झाली नाही, रणजीत सावरकरांचा खळबळजनक दावा

Jan 29, 2024 06:35 PM IST

Ranjit Savarkar : नथुराम गोडसे हे गांधी यांना मारायला आले होते हे शंभर टक्के खरं, त्यांनी गोळ्या मारल्या हेही खरे आहे. पण नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही, असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.

Ranjit savarkar
Ranjit savarkar

नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झाली नाही, असा दावा रणजीत सावरकर यांनी केला. गांधी हत्येचा तपास नीट झाला नाही. यामुळे याचा फायदा नेहरू घराण्याला झाला. फॉरेन्सिक तपासाच्या आधारे आपण असं वक्तव्य करत असल्याचे सावरकर यांनी म्हटलं आहे. गांधी हत्येनंतर २० वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा आयोग नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत, म्हणजे सत्य बाहेर येईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रणजीत सावरकर म्हणाले की, गोळीबारानंतर महात्मा गांधींच्या शरीरावरील जखमांची जी मापे आहेत. त्यात एंट्री होल ४.२ MM तर एक्झिट होल ६.५ MM आहे. गोडसेची पिस्तुल ही ९ MM ची होती. त्यामुळे जर गोडसेंची गोळी लागली असेल तर ही जखम मोठी असायला हवी होती. तसेच एक गोळी बाहेरून आतमध्ये आलीय तर दुसरी गोळी आतून बाहेर आलेली आहे. वेगवेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गोडसेने केवळ २ फुटावरून गोळी झाडल्याचे म्हटले गेले. मात्र ती जखम या गोळ्यांची नाही. तसेच दोन किंवा जास्त मारेकऱ्यांनी छोट्या गोळ्यांनी ही हत्या केली. नथुराम गोडसेने ही हत्या केली नाही हे फॉरेन्सिक पुराव्यातूनसिद्ध होते. त्या जखमेवरील दिशाही गोडसेच्या पिस्तुलीतून झाडलेल्या गोळीची नाही असा दावा त्यांनी केला.

नथुराम गोडसे हे गांधी यांना मारायला आले होते हे शंभर टक्के खरं, त्यांनी गोळ्या मारल्या हेही खरे आहे. पण नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

२ फूट अंतरावरून म्हणजे इतक्या जवळून अशा गोळ्या मारणे शक्य नाही, मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता. फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीवर आधारित आहे त्याचा फोटो जोडला आहे. पोलिसांनी पंचनामे खोटे बनवले आहेत.हे सगळं मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. मी हे सर्व फॉरेन्सिक तपासातून मांडत आहे. गांधी हत्येचा तपास पुन्हा करण्याची मागणी मी केंद्राकडे करणार नाही, ही मागणी जनतेने करावी.

WhatsApp channel