मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रुग्णालयातून बाहेर येताचा नवनित राणांचे मुख्यमंत्र्याना आव्हान! हिम्मत असेत तर..

रुग्णालयातून बाहेर येताचा नवनित राणांचे मुख्यमंत्र्याना आव्हान! हिम्मत असेत तर..

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 08, 2022 06:07 PM IST

खासदार नवनित राणा यांनी रविवारी लीलावती रुग्णालयातून बाहेत येताच थेट मुख्यमंत्र्यांवर निशाना साधलायं. राणा यांनी मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान दिले आहे.

Mumbai, May 08 (ANI): Independent MP from Amravati Navneet Kaur Rana speaks to the media after getting discharged from Lilavati Hospital, in Mumbai on Sunday. (ANI Photo)
Mumbai, May 08 (ANI): Independent MP from Amravati Navneet Kaur Rana speaks to the media after getting discharged from Lilavati Hospital, in Mumbai on Sunday. (ANI Photo) (Deepak Salvi)

मुंबई : मुख्यमंत्री यांच्या निवास्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक होऊन सध्या जामिनावर असलेल्या खासदार नवनित राणा यांनी रविवारी लीलावती रुग्णालयातून बाहेत येताच थेट मुख्यमंत्र्यांवर निशाना साधलायं. राणा यांनी मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद रंगणार आहेत.

खासदार नवनित राणा यांच्यावर लीलावती रग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांनी रविवारी डिस्चार्ज घेतला. रुग्णलयातून बाहेर येताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला. राणा म्हणाल्या, ‘मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते, जर तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावे आणि निवडून येऊन दाखावे. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील तेथे मी उभी राहून जिंकून दाखवेल असा प्रहारही राणा यांनी मुख्यमंत्र्यावर केला.

राणा म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांना जनतेची खरी ताकद नक्कीच कळेल. त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येईल. शिवसेनेकडे गेल्या दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. मात्र, येणा-या निवडणूकीत जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. त्यांच्या विरोधात मी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवेल. एवढेच नाही तर शिवसेनेने मुंबई पालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची तयार केलेली लंका आम्ही नष्ट करू असेही राणा म्हणाल्या.

सरकारने तुरूंगात डांबल्याच्या प्रश्नावर राणा म्हणाल्या, सरकार सुडबुद्धीने वागले. मला १४ काय तर १४ वर्ष जरी तुरुंगात ठेवले तर मी राहायला तयार आहे. मी अशी काय चूक केली की माला ही शिक्षा दिली गेली. हनुमान चालिसा वाचने आणि भगवान श्रीराम यांचे नाव घेणे गुन्हा असेल तर मी सरकार जेवढे दिसव तुरुंगात ठेवतील तेवढे दिवस राहयाला तयार आहे असेही राणा म्हणाल्या. मला तुरुंगात डांबून माझा आवाज उद्धव ठाकरे दाबू शकत नाही. आमची लढाई ही देवाच्या नावाची आहे, ही लढाई अशीच सुरू राहिल असेही त्या म्हणाल्या.

IPL_Entry_Point