मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेच्या सभेला रामदास कदम राहाणार अनुपस्थित, काय आहे कारण, वाचा
रामदास कदम
रामदास कदम (हिंदुस्तान टाइम्स)
14 May 2022, 3:35 AM ISTDilip Ramchandra Vaze
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 3:35 AM IST
  • शिवसेनेचे कोकणातले नेते रामदास कदम आज होणाऱ्या मुंबईतल्या शिवसेनेच्या सभेला उपस्थित राहाणार नाहीत. मात्र आपण पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय.

शिवसेनेची सभा असेल आणि त्या सभेत रामदास कदम नावाची तोफ धडाडणार नाही असं फारसं कधी होताना पाहायला मिळालं नाहीय. करोनानं दोन वर्ष वाया गेल्यानंतर आधी राज ठाकरे, त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभा. त्यानंतर राणा दांपत्याचा अंक या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची आज मुंबईत महासभा होत आहे. या सभेचे तीन टीझरही प्रदर्शित करण्यात आलेत. मला फक्त तुमची वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करुन दाखवतो अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांविरोधात रणशिंग फुंकलं आहे. या सभेला राज्यातले सारे शिवसेनेचे महत्वाचे नेते उपस्थित राहाणार आहेत. मात्र या सभेला उद्धव ठाकरेंच्या मर्जीतल्या रामदास कदम यांची उपस्थिती नसणार आहे. रामदास कदम या सभेला उपस्थित राहाणार नसल्यानं सहाजिकच शिवसेनेच्या वर्तुळात शंकांना उधाण आलं होतं. मात्र रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत एक संदेश उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. गावातील मंदिरात सप्ताह कार्यक्रम असल्यामुळे आपण सभेला उपस्थित राहणार नाही असं रामदास कदम यांनी सांगितलं आहे. मी जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. गावातील मंदिराचा हा सप्ताह कार्यक्रम संपल्यानंतर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत असा संदेश रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंकडे पाठवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आज दोन वर्षांच्या कालावधीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेआधीच महापालिकेच्या विविध कार्यक्रमातून जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. गेले काही दिवस आपण माणसातच आलो आहोत. आज मास्क काढला, पण तसा मास्क काढायचा आहे तो १४ तारखेला काढीन. हा मुंबई महापालिकेचा कार्यक्रम आहे, त्यामुळे राजकीय भाषण करून पाणी गढूळ करणार नाही. असं अनेकदा उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं होतं.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग