मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ramdas Kadam: रामदास कदम उद्धव ठाकरेंवर संतापले; म्हणाले, बाळासाहेबांचं नाव लावता आणि...

Ramdas Kadam: रामदास कदम उद्धव ठाकरेंवर संतापले; म्हणाले, बाळासाहेबांचं नाव लावता आणि...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 24, 2023 11:19 AM IST

Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray: विधिमंडळात लावण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट यांच्या तैलचित्रावरून शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray
Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray

Balasaheb Thackeray Oil Painting: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानभवनातील तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमावरुन राज्यातील राजकारणात थिणगी पडल्याची पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तैलचित्रावरून नाराजी व्यक्त करत भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. या टीकेला शिंदे गटातील नेते रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिले आहे. वडील म्हणून ज्याचे नाव लावता त्याचे तैलचित्र लावताना राजकारण का करता? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

बाळासाहेब साहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून भाजप आणि शिंदेगटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर देत रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमाला आले असते तर चांगले झाले असते. तैलचित्र आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला तरी ठाकरेंनी राजकारण बाजूला ठेवत या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे होते. कारण, हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. अशा कार्यक्रमाद्वारेही जर राजकारण करण्यात येत असेल तर चुकीचं आहे असेही रामदास कदमांनी म्हटलंय.

"प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे आणि इतरांना बदनाम करायचे, हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. तुम्ही राजकारण नसल्यापासून आम्ही बाळासोबत आहोत. वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना राजकारण करता का?" असा प्रश्न उपस्थित करत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांचे वडील चोरत आहेत. परंतु, हे करत असताना त्यांनी स्वत:च्या वडील कोण? हे विसरू नये म्हणजे झालं. बाळासाहेबांच्या फोटोशिवाय त्यांना मतं मिळू शकणार नाहीत. नाही तर त्यांनी निवडणुकीत मोदींचा फोटो लावावा आणि आम्ही बाळासाहेबांचा लावू. विधीमंडळात तैलचित्र लावताय अभिमानास्पद, पण तुमचा हेतू चुकीचा आहे.”

IPL_Entry_Point