मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एकनाथ शिंदेंच्या बंडावर फडणवीसांची भूमिका काय? आठवलेंनी सांगितलं!
Ramdas Athawale - Devendra Fadnavis
Ramdas Athawale - Devendra Fadnavis

एकनाथ शिंदेंच्या बंडावर फडणवीसांची भूमिका काय? आठवलेंनी सांगितलं!

25 June 2022, 19:17 ISTGanesh Pandurang Kadam

Ramdas Athawale meets Devendra Fadnavis: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. 

Ramdas Athawale on Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राजकीय पेच निर्माण झाला आहे. या बंडामागे भाजप असल्याचीही चर्चा आहे. मात्र, भाजपकडून अद्याप कुठलंही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सध्याच्या परिस्थितीत भाजपची भूमिका काय आहे हे त्यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितलं.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटाची इच्छा आहे. याविषयी आठवले यांनी फडणवीसांची भूमिका जाणून घेतली. ‘भाजपची भूमिका सध्या 'वेट अँड वॉच’ची असून सरकार स्थापन करण्याची आपल्याला घाई नाही. शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे. याबाबत आपण कोणतीही घाई करणार नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्याकडं ३७ आमदार असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असंही आठवले यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची महाविकास आघाडीची खेळी हा या अमदारांवर अन्याय ठरेल. या अमदारांवर निलंबन कारवाई असंविधानिक ठरेल. अशी चुकीची व घटनाविरोधी कृती महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे आमदार मुंबईत आल्यावर ते आपला मताचा अधिकार बजावतील. मात्र त्यांच्यावर कोणी दादागिरी करू नये. दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. आमदार आणि त्यांच्या कुटुंबावर आणि कार्यालयावर हल्ला करण्याची भूमिका कोणी घेतली तर आरपीआयचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना व त्यांच्या समर्थकांना संरक्षण देतील, त्यांना साथ देतील, असा इशारा आठवले यांनी दिला.