Ram Shinde allege on Ajit Pawr Rohit Pawar meeting : राज्यात निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राम शिंदे यांचा काही मतांनी पराभव झाला. रोहित पवार यांचा केवळ १२४३ मतांनी विजय झाला. दरम्यान, आज अजित पवार यांची आणि रोहित पवार यांची प्रीतीसंगमावर भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या व्यक्तव्यावरून भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी त्यांच्यावर गंभीर टीका केली. अजित पवार यांनी युतीधर्म पाळला नाही. मी नियोजित कटाचा बळी ठरलो. पवार कुटुंबियांमधील छुप्या युतीने करार केल्याने माझा पराभव झाला, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावेळी भर पत्रकार परिषदेत त्यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या.
प्रीतिसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर रोहित पवार व अजित पवार यांची आज सकाळी भेट झाली. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांना नमस्कार केला. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना मिश्किलपणे कानपिचक्या दिल्या. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांनी त्यांचं दर्शन घ्यायला लवले. बेटा काकाचं 'दर्शन' घे.. थोडक्यात बचवला! जर मी या ठिकाणी सभा घेतली असती तर काय झालं असतं असं म्हणूत अजित पवार यांनी रोहित यांना पाया पडायला लावले.
अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील संवादावरून राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. राम शिंदे म्हणाले, राज्यात सर्वात कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझा नंबर लागतो. मी कटाचा आणि पवार कुटुंबातील अघोषित कराराचा बळी ठरलो आहे हे आता सिद्ध झालंय. जाहीररित्या प्रसारमाध्यमातून याविषयी बोलण्याची माझी मानसिकता नव्हती. मात्र, जर अजित दादाच यासंदर्भात बोलले असतील, तर मलाही समाजमाध्यमांतून बोलण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. पक्षाकडे आणि वरिष्ठांकडे मी बोललो आहे. यावर वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई केली पाहिजे, असे भावूक होऊन राम शिंदे म्हणाले.
कर्जत जामखेडमध्ये भाजपचे राम शिंदे आणि शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्यात थेट लढत झाली. चुरशीच्या या सामन्यात रोहित पवार हे सुरवातीला मागे होते. मात्र, पुन्हा ते पुढे आले. दरम्यान, राम शिंदे यांना काही मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी पुन्हा फेर मतमोजणी घेण्याची मागणी रोहित पवार यांनी केली. यात आमदार रोहित पवार यांचा १२४३ मतांनी विजय झाला. त्यांना १ लाख २७ हजार ६७६ मते मिळाली. तर भाजपचे राम शिंदे यांना १ लाख, २६ हजार ४३३ मते मिळाली आहे.