मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parbhani News : रामनवमीच्या मिरवणुकीत पोलिसांनी डीजे लावू न दिल्याने रागाच्या भारत दोन तरुणांनी विष प्यायलं
Pune crime
Pune crime (HT_PRINT)

Parbhani News : रामनवमीच्या मिरवणुकीत पोलिसांनी डीजे लावू न दिल्याने रागाच्या भारत दोन तरुणांनी विष प्यायलं

31 March 2023, 14:54 ISTNinad Vijayrao Deshmukh

Parbhani News : परभणी येथे काल रामनवनी निमित्त आयोजित मिरवणुकीत डिजे वाजवू न दिल्याने दोन तरुणांनी रागाच्या भरात थेट विष प्राशन केले.

परभणी: परभणी येथे काल रामनवमीनिमित्त शोभा यात्रा काढण्यात आली होती. मात्र, एका शोभा यात्रेत पोलिसांनी डीजे लावण्यापासून रोखल्यामुळे या मिरवणुकीतील दोन तरुणांनी रागाच्या भरात विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यातील एका तरुणाची प्रकृती ही चिंताजनक आहे. ही घटना शहरातील मानवत परिसरात घडली. ही घटना घडल्यावर तातडीने दोघांनाही मानवत येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शुभम आप्पासाहेब दहे, शिवप्रसाद बिडवे असे विष प्यायलेल्या मुलांची नावे आहेत. रामनवमी निमित्त मानवत येथे गुरुवारी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मिरवणुकीला सुरुवात होणार होती. मात्र, यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत येथे डीजे वाजवण्यास परवानगी नाही असे म्हणत सिंगर बँड पथकास वाजवण्यास मनाई केली. यामुळे शोभायात्रा उशिरा निघाली. सिंगर बँडला प्रतिबंध केल्यामुळे जमलेल्या युवक नाराज झाले. यातील शुभम अप्पराव दहे (वय २३) शिवप्रसाद बिडवे( वय २२) यांना पोलिसांच्या वागणुकीचा राग आला.

त्यांनी विषारी औषध प्यायले. दरम्यान, उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु युवकाची परिस्थिती गंभीर झाल्याने परभणीत उपचारासाठी नेण्यात आले. ही घटना घडल्यानंतर संतप्त नातेवाईक मानवत पोलिस स्टेशनमध्ये जात ठिय्या आंदोलन केले. तसेच पोलिसांवर अनेक आरोप केले. 'तू पॉयझन घे आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही. सगळं डिपार्टमेंट माझ्या हातात आहे.

माझं कोणी काही वाकड करू शकत नाही', अशी धमकी पोलिसांनी या युवकांना दिली. यामुळे संतप्त झालेल्या मुलांनी विष प्यायले. माझ्या मुलाच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर मी पोलीस स्टेशन समोरच आत्महत्या करेन, अशी भावना यावेळी मुलाच्या यांनीने बोलून दाखवली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप देखील युवकांच्या नातेवाइकांनी केला आहे.

विभाग