Rajasthan News: राजस्थानमधील कोटा येथील एका व्यक्तीने आपल्या २१ वर्षीय मुलाला मोबाइल फोन भेट दिला, पण हा मोबाइल फोन एक दिवस आपल्या जीवाला धोका निर्माण करेल याची त्याने कल्पनाही केली नसेल. गाणी ऐकण्यासाठी सोबत घेऊन नेलेला मोबाईल शेतात विसरल्याने मुलाने वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या घटनेत वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी मुलगा घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, मांगीलाल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, राकेश असे आरोपीचे मुलाचे नाव आहे. मांगीलालने काही दिवसांपूर्वी आपल्या राकेशसाठी फोन विकत घेतला. परंतु, मांगीलाल गाणे ऐकण्यासाठी राकेशचा फोन वापरायचे. शेतात काम करताना गाणे ऐकण्यासाठी ते राकेशचा फोन सोबत घेऊन जायचे. घटनेच्या दिवशी मंगीलाल हे राकेशचा फोन शेतातच विसरले. घरी आल्यानंतर राकेशने मंगीलालला फोनबाबत विचारले. मंगीलालने फोन शेतात विसरल्याचे राकेशला सांगितले. हे ऐकल्यानंतर राकेशच्या तळपायची आग मस्तकात गेली. मंगीलालने फोन विकला आहे, असे त्याला वाटले आणि याच रागाच्या भरात त्याने वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला.
वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्यानंतर राकेश घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मांगीलाल यांच्या जावयाने त्यांना रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी राकेशविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशच्या कडौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरचंदपूर येथे २१ दिवसांपूर्वी २९ सप्टेंबर रोजी पुतण्याचा खून करून पळून गेलेल्या आरोपी काकांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. कडौरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरचंदपूर येथे २९ सप्टेंबर रोजी घरगुती वादातून अरुण कुमार (वय, २६) या तरुणाची काका बाबू मिस्त्री याने हत्या केली. मृताची पत्नी सपना हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली. परंतु, आरोपी पोलिसांना सापडला नाही. शनिवारी खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला कोतवाली कालपीतील सोहरापूर येथून अटक केली. स्टेशन हाऊस ऑफिसर प्रभात कुमार सिंह यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे, त्याने चौकशीत सांगितले की, तो त्याचा भाऊ शिवप्रसादवर नाराज होता आणि त्याने पुढे सांगितले की त्यांनी त्याच्या घरात बांधलेल्या मंदिराची मूर्ती तोडली होती, ज्यामुळे त्याच्या मनात राग आला होता, म्हणून त्याने त्याला धडा शिकवण्यासाठी आपल्या खऱ्या पुतण्याच्या छातीत चाकूने वार केले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला द. आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या