"राष्ट्रपतींना विनंती आहे की, मला फक्त एक खून माफ करा...", भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "राष्ट्रपतींना विनंती आहे की, मला फक्त एक खून माफ करा...", भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?

"राष्ट्रपतींना विनंती आहे की, मला फक्त एक खून माफ करा...", भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?

Published Oct 13, 2024 04:13 PM IST

Raj thackeray : राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे. मलाफक्तएक खून माफ करा. ज्यांने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना, त्याचा मला खून करायचा आहे.

राज ठाकरे
राज ठाकरे

मनसे नेते राज ठाकरे यांनी आज गोरेगाव कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलतानाराज ठाकरे यांनीएकमिश्किल वक्तव्य केलं आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना राज ठाकरे म्हणालेकी, माझी राष्ट्रपतींकडे विनंती आहेमला एक खून माफ करा. ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायचा आहे. आरे सगळ्यांना फोटो देणे शक्य होत नाही. दरवेळी येऊन फोटो काढणे हा एक आजार आहे. कुठे तरी या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत असं मला वाटतं.

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे. मलाफक्तएक खून माफ करा. ज्यांने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना, त्याचा मला खून करायचा आहे. सर्वांना फोटो देणं शक्य होत नाही हो, एकानं तोंडाजवळ कॅमेरा आणला. मी म्हटलं नाकातील केस काढायचे आहेत का? कशासाठी फोटो. वर्धापन दिन, वाढदिवस असेल तरी फोटो काढतात. एखाद्याचा फोटो नसेल तर समजू शकतो. दरवर्षी फोटो काढतात. हा आजार आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजे. मला त्रास होतो. अनेकांना त्रास होतो.यामुळे महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही. त्याबद्दल माफी मागतो, पुढच्या वेळी जास्तीत जास्त मन सैनिकांना भेटेन, असं राज ठाकरे म्हणाले.

या मेळाव्यात रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरे म्हणाले की, जगात खूप कमी पाय उरलेत,ज्यांच्या पाया पडावसं वाटतं. अनेक वेळा त्यांना मी भेटलो. अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. रतन टाटा हे देशाचे मानबिंदू होते. रतन टाटांकडून जगाला अनेक गोष्टी मिळाल्या.

..तर महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा-

रतन टाटांसारखे सरळ,सभ्य लोक तुम्हाला आवडतात मग राजकारणी का आवडत नाहीत. आमदार फोडाफोडी करायची आणि राजकारण तापवायचं. एखाद्या पक्षासोबत निवडणुका लढवायच्या आणि परत दुसऱ्या पक्षात जायचं आणि सत्तेमध्ये बसायचं. हेच गेल्या पाच वर्षात आपण बघत आहोत. मग नक्की तुम्हाला आवडते काय?आज जर महाराष्ट्रातील जनतेने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा.

मनसे स्वबळावर लढणार –

मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे.मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. विधानसभा स्वतंत्र लढणार,कोणाशीही युती व आघाडी करणार नाही,असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले,आगामी निवडुकीसाठी ना यु्त्या,ना आघाड्या... आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेतील पक्ष असेल. ज्या लोकांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत त्या लोकांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू... जगाला हेवा वाटवा असा महाराष्ट्र घडावा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर