मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : शिक्षकांनो निवडणुकीचं काम करु नका, निवडणूक आयोग ५ वर्ष काय करत असतं?, राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray : शिक्षकांनो निवडणुकीचं काम करु नका, निवडणूक आयोग ५ वर्ष काय करत असतं?, राज ठाकरेंचा सवाल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 19, 2024 11:12 PM IST

Raj Thackeray On Election Commission : निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतो. निवडणुका अचानक आल्यात का? तुमची यंत्रणा तयार नको का?असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

Raj Thackeray On Election Commission
Raj Thackeray On Election Commission

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग तयारीला लागले असून मुंबईसह राज्याभरातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावले आहे. शिक्षकांच्या इलेक्शन ड्युटीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षकांना आता शिकवण्याऐवजी निवडणुकीसाठी काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिले आहेत.

लोकसभा निवडणुका होईपर्यंत शिक्षकांना शाळाबाह्य काम लावले आहे. शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची कैफियत घेऊन शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक राज ठाकरे यांना भेटायला गेले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच असा इशारा आयोगाला व प्रशासनाला दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते. त्याच्या शाळेला एक नोटीस आली असून पहिली ते चौथीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बोलवून घेण्यात आलं आहे. शिक्षकांना शाळाबाह्य कामे लावल्यानंतर मुलांना शिकवण्याची व्यवस्था नाही. मुंबईत ४१३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बाहेर काढण्यात आलं आहे. निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतं? असल्या प्रकारची कोणतीही लोक ते तयार का करत नाही. आयत्यावेळी शाळांवर दडपण का आणतात?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

या कामासाठी हजर न झाल्यास सरकार या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करणार.  निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का नाही करत? निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतो. निवडणुका अचानक आल्यात का?तुमची यंत्रणा तयार नको का? यामध्ये त्या मुलांचा काय दोष? शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी आलेत का? आमचे लोक यासंदर्भात निवडणूक आयोगासंदर्भात बोलतील. माझी शिक्षकांना विनंती आहे की तुम्ही कुठेही रुजू होऊ नका, तुम्ही विद्यार्थ्यांवर लक्ष्य द्या. विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांचे काम आहे. निवडणुकीचे काम करणे हे शिक्षकांचे काम नव्हे.

IPL_Entry_Point