मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : पुन्हा बांबू लावाल तर.., जेव्हा राज ठाकरे टोल नाक्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकतात

Raj Thackeray : पुन्हा बांबू लावाल तर.., जेव्हा राज ठाकरे टोल नाक्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकतात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 07, 2024 10:44 PM IST

Raj Thackeray stuck traffic : पिंपरी चिंचवड येथील १०० नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपून मुंबईकडे जाताना राज ठाकरे खालापूर टोलनाक्यावरील ट्रॅफिक जाममध्ये अडकले. त्यांनी खास आपल्या शैलीत टोल कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.

Raj Thackeray stuck traffic
Raj Thackeray stuck traffic

टोलनाक्याच्या ट्रॅफिकमध्ये तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकून पडण्याचा अनुभव सामान्य माणसांसाठी नवा नाही. मात्र टोल नाके बंद करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरेच आज खालापूर टोलनाक्यावरील ट्रॅफिक जाममध्ये अडकले. यामुळे सामान्य लोकांना प्रवास करताना कशा अडचणींचा सामना करावा लागतो, याचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये १०० व्या नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून राज ठाकरेपुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या पाच किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या.

ट्रॅफीकमुळे लोकांची गैरसोय होत असल्याचं पाहून राज ठाकरे गाडीतून उतरून स्वत: टोलनाक्यावर गेले आणि त्यांनी अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. यानंतर राज ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्याला दम दिला. पुन्हा बांबू लावला तर सगळ्यांच्या बांबू लावेन मी, एक जरी गाडी अडकली तरी याद राखा.  कुठपर्यंत ट्राफीक आहे ते माहिती आहे का? रुग्णवाहिका अडकली आहे रस्त्यात, असा इशारा राज ठाकरे यांनी टोल कर्मचाऱ्यांना दिला.

राज ठाकरेंनी टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी करून वाहनांना रस्ता करून दिला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेने टोलविरोधात अनेकवेळा आक्रमक आंदोलनं केली आहेत. मनसेच्या दणक्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याच्या विरोधातआंदोलन केलं होतं. मनसैनिकांनी या मार्गावरील अनेक टोलनाके फोटून कंत्राटदारांच्या वाहनांची नासधूस केली होती.

WhatsApp channel