Vishwa Marathi Sahitya Sammelan Pune : पुण्यात तिसरे विश्व मराठी संमेलन आज पार पडले. हे विश्व मराठी संमेलन मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते रितेश देशमुख यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेसह विविध विषयांवर भाष्य केलं. राज्य सरकारने आणि आम्ही-तुम्ही सर्वांनी आपली मराठी भाषा टिकवली पाहिजे,असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं. ‘अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो,पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कारच असतो’,असं म्हणत राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली.
राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुख याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी एक अभिनेत्यांना पुरस्कार मात्र आमच्या वाट्याला तिरस्कार असे मिश्किल वक्तव्य केल्यां उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या मनात असेल की मी येथे कसा?हा शासनाचा कार्यक्रम आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मला गळ घातली आणि या कार्यक्रमासाठी बोलावलं. त्यामुळे मला आपलं सर्वांचं दर्शन झालं म्हणून मी उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो. माझे मित्र अभिनेते रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ही सर्व भाग्यवान माणसं. मी पुरस्कार दिला म्हणून नाही तर त्यांना पुरस्कार मिळतात आणि आमच्या वाटेला फक्त तिरस्कार असतो. तो घेऊन आम्हाला वाटचाल करावी लागते.
राज ठाकरे म्हणाले, मराठी भाषेप्रमाणे सरकारने मराठी माणसाचे अस्तित्व टिकवले पाहिजे. आपण आपल्या भाषेवर ठाम राहिले तरच जग आपल्याला दाद देतात. बाकीची राज्य आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगत असतील तर आपणही अशीच भूमिका घेतली पाहिजे. देशात आजपर्यंत कोणत्याही राज्याचे राज्यगीत नाही. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे ज्याचे राज्यगीत आहे. इतिहास म्हणजे भूगोल. कोणीही एखादा भूभाग मिळवल्यानंतर बनतो तो इतिहास. भूगोलाशिवाय इतिहास नाही. प्रगतीच्या नावावर जमीन जात असतील तर त्याला विकास म्हणत नाही. विकासाच्या नावावर जमीनी जाणार असतील तर याला विकास म्हणता येणार नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
राज ठाकरेंनी राज्यात वाढणाऱ्या परप्रांतीय लोढ्यांवरून सरकारवर टीका केली. भारतीय असूनही मराठी माणसाला दुसऱ्या राज्यात जमीन घेता येत नाही, शहरातील मराठी माणूस बेघर होतोय, परप्रांतीयांच्या ताब्यात जमिनी जात आहेत,असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
शहरात माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. लोकं आमच्या राज्यात बेघर होणार असतील तर त्याला विकास म्हणत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जर गेला तर तिथे तुम्हाला जमीन विकत घेता येत नाही. भारतीय असून सुद्धा पण आमच्याकडे तुम्ही या आमची जमीन घेऊन जा,अशी स्थिती असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.
संबंधित बातम्या