मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन् मग अयोध्येला जावं - रामदास आठवले
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर रामदार आठवलेंची टिप्पणी
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर रामदार आठवलेंची टिप्पणी
13 May 2022, 4:02 PM ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
13 May 2022, 4:02 PM IST
  • आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे.

सातारा - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. यूपीतील भाजप खासदाराने जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत, तो पर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री व रिपाईचे अध्यक्ष (आठवले गट) रामदास आठवले यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या वारीवर टिप्पणी केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

रामदास आठवले आज सातारा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे साताराचे अध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्यच आहे. 

राज ठाकरेंनी यापूर्वीच अयोध्येला जायला हवं होतं -

राज ठाकरे यांना एवढ्या दिवसांनी आयोध्या आठवली आहे, त्यांना आयोध्याला जायचं आहे. पण त्यांनी यापूर्वीच अयोध्याला जायला हवं होतं. त्यांच्या विरोधात उत्तर भारतीयांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी. आपण भारतात राहणारे सर्व भाषी एकच आहोत याचा विचार त्यांनी करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्री यांनी केला नव्हता, तेव्हा उत्तर भारतीय ब्राह्मण असणाऱ्या गागाभट्टांनी केला होता हा इतिहास लक्षात ठेवायला हवा.” असा सल्लाही त्यांनी ठाकरे यांना दिला.

मुंबईत मराठी माणसावर अन्याय होऊ नये हीच आमचीही भूमिका -

मुंबईत मराठी माणसावर अन्याय होता कामा नये या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पण जी कामे यापूर्वी मराठी माणसं मुंबईत करायची ती कामे हल्ली मराठी माणसं करत नाहीत, म्हणून उत्तर भारतीय लोक मुंबईत वाढले आहेत. उत्तर भारतीयांनी त्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्य आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. असा पुनरुच्चार त्यांनी केला. 

भगवे वस्त्र परिधान करणारा माणूस वाद पेटवत नाही -

राज ठाकरे यांनी भगवे वस्त्र अंगावर घेतले आहे. परंतु हे भगवे वस्त्र हा क्रांतीचा आणि शांततेचा रंग आहे. भगवान गौतम बुद्धांनीही हे वस्त्र परिधान केले आहे. भगवे वस्त्र परिधान करणारा माणूस वाद पेटवत नाही. समाजा-समाजामध्ये विष कालवत नाही. तुम्ही हिंदू आहात तुम्हाला अयोध्याला जाण्याचा अधिकार आहे. त्यापूर्वी तुम्ही उत्तर भारत यांची माफी मागा. त्यांच्या मनाचाही विचार करा, असेही आठवले म्हणाले.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग