मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray on Sharad Pawar : “..तर मी शरद पवारांना वाकून नमस्कार करेन”; राज ठाकरे असं का म्हणाले?

Raj Thackeray on Sharad Pawar : “..तर मी शरद पवारांना वाकून नमस्कार करेन”; राज ठाकरे असं का म्हणाले?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 07, 2024 08:49 PM IST

Raj Thackeray on Sharad Pawar : जर येथे शरद पवार आले तर मी त्यांच्या वाकूनपाया पडेन. तीच आपली संस्कृती आहे, असं वक्तव्य ऱाज ठाकरे यांनी पिंपरीमधील नाट्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत केले.

Raj Thackeray on Sharad Pawar
Raj Thackeray on Sharad Pawar

शरद पवार जर येथे आले तर मी त्यांच्या वाकून पाया पडेल, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केल्यानं याची सद्या जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे पिंपरी चिंचवडमध्ये १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले, असा मानसन्मान आपल्या मराठी कलाकाराने एकमेकांना द्यावा. मराठी चित्रपट सृष्टीत अशोक सराफ यांना मामा म्हटलं जातं. अरे पण ते तुमचे सख्खे मामा आहेत का? त्यांना आदरणाने अशोक सराफ सर म्हणा. राजकीय भाषेत सांगायचे झाल्यास जर येथे शरद पवार आले तर मी त्यांच्या वाकूनपाया पडेन. तीच आपली संस्कृती आहे.

तुम्ही कलाकारांनी एकमेकांना मान दिला नाही अन् नको त्या नावाने एकमेकांना हाका देत बसलात तर मराठी चित्रपटसृष्टीतून एकही स्टार निर्माण होणार नाही. इतर राज्यातील कलाकारांकडे बघा. रजनीकांत आणि इलाहीराजा रात्री एकत्र बसून दारूपीत बसतील मात्र मंचावर आले की ते एकमेकांना सर म्हणून आदर देतात.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत राज ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पाबाबत मलाअजून कळलेलं नाही. दोन तासात अहमदाबादला जाणार? काय करणार जाऊन? ढोकळा खाणार अन् परत येणार. मुंबईत पण चांगला ढोकळा मिळतो. त्यासाठी एक लाख कोटी कशासाठी घालवायचे? मी हे सतत सांगत राहणार. मराठी माणसाने जागृत राहावं. मराठा माणसाचं लक्ष असलं पाहिजे.

 

तुम्ही कुठल्या पक्षाला मतदान करता आणि पाठिंबा देता, याच्याशी मला देणंघेणं नाही. पण, महाराष्ट्रातील मध्यमवर्गानं राजकारण, समाजकारण, संस्थामध्ये आलं पाहिजे. महाराष्ट्राला सुज्ञ लोकांची गरज आहे.  कारण, महाराष्ट्र हा दिशादर्शक आहे. महाराष्ट्रानं देशाचं प्रबोधन घडवलं आहे. आज तोच महाराष्ट्र सर्व ठिकाणी चाचपडत आहे. ही धोक्याचं घंटा आहे, अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.

WhatsApp channel