मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray in Delhi : दिल्लीत पोहचताच राज ठाकरे म्हणाले; मला निरोप होता म्हणून....!

Raj Thackeray in Delhi : दिल्लीत पोहचताच राज ठाकरे म्हणाले; मला निरोप होता म्हणून....!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 19, 2024 09:22 AM IST

MNS BJP Alliance talks : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे दिल्लीत पोहचले आहेत. भाजप आणि मनसेत युती होणार असल्याची चर्चा असून दिल्लीत पोहचताच राज ठाकरे यांनी सूचक व्यक्तव्य केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे दिल्लीत पोहचले आहेत. भाजप आणि मनसेत युती होणार असल्याची चर्चा असून दिल्लीत पोहचताच राज ठाकरे यांनी सूचक व्यक्तव्य केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे दिल्लीत पोहचले आहेत. भाजप आणि मनसेत युती होणार असल्याची चर्चा असून दिल्लीत पोहचताच राज ठाकरे यांनी सूचक व्यक्तव्य केले आहे. (Hindustan Times)

Raj Thackeray in Delhi : देशातील लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची यादी देखील जाहीर झाली आहे. दरम्यान असे असतांना आता राज ठाकरे हे अचानक दिल्लीला गेल्याने नव्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होतील अशी चर्चा सुरू असतांना अचानक राज ठाकरे दिल्लीला गेल्याने ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत पोहचताच राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरे हे महायुतीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतांना काल रात्री राज ठाकरे हे दिल्लीत रवाना झाले. या ठिकाणी ते अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. दरम्यान, राज ठाकरे तडकाफडकी दिल्लीसाठी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत राज ठाकरे हे एका विशेष चार्टर्ड विमानाने दिल्लीला गेले असून येथे ते महायुती संदर्भात चर्चा करणार आहेत.

Narendra Modi : अब की बार ४०० पार.. इतक्या जागा कशाला हव्यात?, पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

मुंबईत भाजपपुढे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आव्हान आहे. या साठी कोणताही धोका त्यांना पत्करायचा नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना दोन जागा देऊन त्यांना महायुतीत सहभागी करून घेण्याचा मानस भाजपचा आहे. या साठी भाजप आणि मनसेमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुप्त चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी दिल्लीत पोहचताच शुचक वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, मला दिल्लीत या असा निरोप होता. त्यामुळे या ठिकाणी आलो आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. बैठकीनंतर काय निर्णय घेतला जाणार हे कार्यकर्त्यांशी ठरवून करळवणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता ते कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

 

IPL_Entry_Point