अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज थाटात प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पार पडल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला आनंद साजरा केला. ठाकरे यांनी यावेळी राम मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्या कारसेवकांची आठवण करत ट्विट केलं आहे.
असं ट्विट राज ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात आज प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा विधी झाला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल हे उपस्थित होते.
अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडत असताना माजी मुख्यमंत्री, शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ठाकरे आज नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करणार आहे. ठाकरे हे आज गोदाकाठी गोदावरी नदीचे पूजन करणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठी ठाकरे गटाच्या वतीने स्वागताचे बॅनर्स आणि झें झळकले आहे.
उद्धव यांचे देवळालीत आज जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात २५ फुटांचा हार घालण्यात आला. जेसीबी सहाय्याने हार घालण्यात आला. उद्धव ठाकरे हे विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी स्मारकाला भेट देणार आहेत.
संबंधित बातम्या