Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?-raj thackeray non bailable arrest warrant nilanga 16 years ago protest against up bihar people ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?

Raj Thackeray Arrest Warrant: मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?

Aug 31, 2024 10:26 PM IST

Raj Thackeray Arrest Warrant: निलंगा न्यायालयाने१६ वर्षापूर्वीच्या प्रकरणात आज राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. महामंडळाची बस फोडल्याने आणि जाळपोळ केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी
राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वारंट जारी

Raj Thackeray Arrest Warrant : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) चेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वारंट जारी करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याने हे टक वारंट जारी केले आहे. काही वर्षापूर्वी राज ठाकरे याच प्रकरणात निलंगा न्यायालयात हजर झाले होते. १६ वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बसची तोडफोड करून आलग लावली होती. या आंदोलनप्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तसेच राज ठाकरे या प्रकरणातील आठवे आरोपी आहेत.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसची तोडफोड केल्याने आणि जाळपोळ केल्याने राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलंगा न्यायालयाने १६ वर्षापूर्वीच्या प्रकरणात आज राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. महामंडळाची बस फोडल्याने आणि जाळपोळ केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांना निलंगा कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

२००८ मध्ये उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी उदगीर मोड येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात मनसेच्या ८ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नावही घालण्यात आले होते. याआधीही निलंगा न्यायालयात त्यांचा जामीन रद्द केल्याने त्यांना कोर्टात हजर राहावे लागले होते. राज ठाकरे यांच्या वकिलांनी राज ठाकरेंना प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करावे अशी विनंती केली होती. पण त्यावेळी राज ठाकरे यांना जामीन देण्यात आला होता. पण ते तारखेला हजर राहत नसल्याने आता त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

 

या प्रकरणातील तत्कालीन मनसेचे तालुका प्रमुख आणि इतर ३ जण शुक्रवारी न्यायालयात हजर झाले होते. त्यांचे काढलेले वॉरंट विना तामील झाले होते त्यामुळे न्यायालयाने चौघांचा जामीन रद्द केला होता. मात्र राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले असल्यामुळे पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे.