Amit Thackeray will become MLA: राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. दोघांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. राज ठाकरे यांनी फडणवीस यांचे शिवतीर्थावर स्वागत केले. या भेटीत राजपुत्र अमित ठाकरे यांना फडणवीस यांनी आमदार करण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार केले जाण्याची शक्यता आहे. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे भाजपची साथ देण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. राज्याच्या मुख्यमत्र्यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर पोहोचले. . दोघांची भेट झाली असून त्यांनी जवळपास पाऊण तास चर्चा केली. दोघांच्या या भेटीमुळे भाजप आणि मनसेत राजकीय गणितं सुरू असल्याची चर्चा आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मनसेची साथ हवी आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत मुलगा अमित ठाकरे यांचा पराभव झाल्याने राज ठाकरे हे नाराज होते. अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उभे होते. तर एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे सदा सरवणकर हे देखील याच मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उनभे होते. त्यांनी माघार घ्यावी या साठी अनेक प्रयत्न झाले. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. यामुळे अमित ठाकरे यांचा पराभव झाला.
दरम्यान, मुलाचा पराभव जिव्हारी लागल्याने राज ठाकरे नाराज होते. त्यांनी यातूनच विधान सभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांची मनधरणी केली असून त्यांनी या भेटीत भाजपच्या कोट्यातून राज्यपालनियुक्त आमदाराची मनसेला ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजपुत्र अमित ठाकरे विधानपरिषदेचे आमदार होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ११ वाजतामहाराष्ट्रराज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार होते. त्यापूर्वी त्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली.
संबंधित बातम्या