Raj Thackeray: फडणीस आहात म्हणून व्यंगचित्रकार, नाहीतर व्यंगचित्र झालं असतं; राज ठाकरेंचा मिश्किल टोला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: फडणीस आहात म्हणून व्यंगचित्रकार, नाहीतर व्यंगचित्र झालं असतं; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

Raj Thackeray: फडणीस आहात म्हणून व्यंगचित्रकार, नाहीतर व्यंगचित्र झालं असतं; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

Jul 29, 2024 11:15 PM IST

RajThackeray : व्यंगचित्रकार शि. द. फडणीस याच्या नावात‘व’ नाहीत. त्यामुळे ते व्यंगचित्रकार आहेत. जर त्यांच्या नावात व असता तर त्यांचे नाव फडणवीस असतं तर ते चित्रकार न होता त्यांच्यावर व्यंगचित्र काढलं गेलं असतं. त्यामुळे त्यांना व ने वाचवलं. असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

 राज ठाकरेंचा फडणवीसांचा मिश्किल टोला
 राज ठाकरेंचा फडणवीसांचा मिश्किल टोला

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या सत्कारसमारंभातमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या नावावरून कोटी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. फडणीस यांच्या नावावर मिश्किल टिप्पणी करतराज ठाकरेंनी म्हटले की, फडणीस नाव आहे म्हणून ठीक आहे. तुम्ही व्यंगचित्रकार आहात. मात्र नावात जर'व' असतं तर व्यंगचित्र झालं असतं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

व्यंगचित्रकारफडणीस यांचे नाव घेत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यंग केलं जात असल्याचं म्हटलं. व्यंगचित्रकार शि. द. फडणीस याच्या नावात‘व’ नाहीत. त्यामुळे ते व्यंगचित्रकार आहेत. जर त्यांच्या नावात व असता तर त्यांचे नाव फडणवीस असतं तर ते चित्रकार न होता त्यांच्यावर व्यंगचित्र काढलं गेलं असतं. त्यामुळे त्यांना व ने वाचवलं.

दरम्यान सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरुन त्यांच्यावर व्यंग केलं जातं. नेटकरी आणि त्याचे विरोधक त्यांच्यावर मीम्स तयार करत असतात. एका कार्यक्रमात फडणवीसांनी राज ठाकरेंना म्हटलं होतं की, माझं व्यंगचित्र काढताना पोट खूप मोठं काढू नका.

अजित पवार पुण्यात नसतानाही धरणातून पाणी वाहिलं -

यावेळीराज ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात नसतानाही शहरातील धरणातून पाणी वाहिले, असा टोला राज ठाकरेंनीकाढला.

पुण्यात आलेल्या पुरावरून सरकारवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, पण ते नसतानाही धरणं वाहिली. मुळा-मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झालीत.पुण्यात काही दिवसांपूर्वी जो पाऊस झाला त्यावेळेस धरणातून पाणी सोडलं गेलं. हे पाणी सोडलं जाणार आहे याची लोकांना कल्पना नव्हती असं मी म्हणणार नाही,पण ते नक्की किती सोडलं जाणार आहे, कधी सोडलं जाणार आहे,याबाबत अनभिज्ञता होती. त्यामुळे लोकांचं अपरिमित नुकसान झालं आहे. आज घरांचं, गाड्यांचं नुकसान झालं आहे, त्याची भरपाई कशी होणार असा लोकांना प्रश्न पडला आहे. अनेकांच्याकडे या नुकसान भरपाईसाठी इन्श्युरन्स देखील नाहीये. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना इन्शुरन्स कंपन्यांनी नैसर्गिक आपत्तीचे कारण देत भरपाई देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने त्यांना भरपाई द्यायला हवी.

राज ठाकरेंच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले असून प्रवक्ते आणि विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. सुपारी बहाद्दरांनी दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांवर बोलू नये. कारण टोलनाका, भोंगे किंवा अन्य कोणतेही आंदोलन या सुपारीबहाद्दरांचे यशस्वी झालेलं नाही. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे, असा घणाघात मिटकरी यांनी केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर