Raj Thackeray On Bjp : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला राम मंदिरावरुन टोला हाणला आहे. नाशिक येथील एका कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली. राज ठाकरे म्हणाले, निवडणुकितील मुद्दे बदलण्यास वेळ लागत नाही. मला, राम मंदिर तयार झाले याचा आनंद आहे. पण मी भाजपचा मतदार नाही. देशातील अनेक मतदार देखील याच मानसिकेतेचे आहे, त्यामुळे नुसत्या रामाचा जप करणे भाजपला फायद्याचे ठरणार नाही.
राज ठाकरे म्हणाले, कधी काळी कांद्याच्या दरावरून लोकसभेची निवडणूक होत होत्या. काहींच्या सत्ता या मुद्यावरून गेली. सध्या देशात सध्या राम मंदिर सोहळ्याचं वातावरण आहे. पण, निवडणुकीतील मुद्दे बदलण्यास वेळ लागत नाही. निवडणुकीत सर्व मुद्दे सारखेच राहील असे नाही. मागील काही दशकांचा विचार केला तर १९९० मध्ये देशात हिंदुत्वाचे वारे होते. यातुन बाबरी मशिद पाडण्यात आली. यावरून देशात मोठ्या दंगली झाल्या. निवडणुकीवर देखील याचा परिमाण झाला. कट्टर हिंदू मतदारांनी काँग्रेसविरोधात जात मतदान केले. मात्र, हा मुद्दा सर्वच निवडणुकीत चालला नाही. २०१४मध्ये अशाच जनभावनेतून लोकांनी मतदान केले. यामुळे राम मंदिर सोहळ्यातूनही भाजपला फायदा होईल याची शास्वती नाही. मतदार काशावरून समाधानी होतात ते जास्त महत्वाचे आहे.
श्री राम मंदिर सोहळ्यानंतर सुरक्षेसाठी आयोध्येत मोठा फौजफाटा तैनात आहे. लाखो भाविक अयोध्येत जात आहेत. तेथे सगळ शांत झालं की मी अयोध्येला जाईन. तोपर्यंत आपलं काळाराम मंदिर आहे, असे राज ठाकरे म्हणाले.