Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

May 18, 2024 08:27 PM IST

Godan Express : बोगीच्या खालून धूर येताना पाहून आतमधील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच घाबरलेल्या काही प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या.

 गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून  येऊ लागला धूर
 गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून  येऊ लागला धूर

गोदान एक्स्प्रेसच्या (Godan Express Fire)  डब्याखालून धूर निघू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ ही घटना घडली. रेल्वेचे गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी मध्येच थांबवली. बोगीच्या खालून धूर येताना पाहून आतमधील प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच घाबरलेल्या काही प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. यानंतर गार्ड आणि रेल्वे चालक खाली उतरले व त्यांनी एक्सप्रेस तपासून गाडी पुढे रवाना केली. 

मुंबईकडे जाणारी गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंढेगावजवळ आली होती. बोगीच्या खालून मोठा धूर निघू लागला. त्यानंतर गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली होती. मात्र डब्या खालून धूर निघत असल्याचे पाहुन काही प्रवाशांची गाडीतून उड्या मारल्या.

अप मार्गाच्या गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने धूर निघाल्याचे सांगण्यात येत आहे.  यानंतर गाडी इगतपुरी स्थानकात आली. गाडीची बोगी लायनर दुरुस्त करून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. 

ट्रेनचे रिझर्व्हेशन कोच नंबर एस् ०७ चे ब्रेक लॉकर - कॅलीपर धावत्या स्थितीत चाकांना लॉक झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे घर्षण झाले आणि चाकांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

एक्सप्रेस थांबवून फायर एक्सटुबीशनच्या मदतीने ट्रेनचे ॲसिस्टंट लोको पायलट आणि एसी ॲटेंडट यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. 

आगीची कोणतीही मोठी घटना नसल्याची खात्री झाल्यावर गोदान एक्सप्रेस इगतपुरीकडे रवाना करण्यात आली. गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीच्या बोगीच्या लायनरची दुरुस्ती करून गाडी मुंबईच्या दिशेने रवाना रवाना झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! 

पुणे विमानतळावर सुखोई विमानाचे टायर फुटल्याने किरकोळ अपघात यापूर्वी झाले आहे. मात्र, आज मोठी दुर्घटना या विमानतळावर टळली आहे. पुणे ते दिल्ली या एयर इंडियाच्या विमानाला 'पुश बॅक टग' ट्रकची धडक धडक बसल्याने या विमानाला मोठे भगदाड पडले. सुदैवाने ही बाब लक्षात आल्याने या विमानाचे उड्डाण रोखण्यात आले. यामुळे मोठा अपघात टळला आहे. विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांचे मात्र, हाल झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर