Raigad Rain : रायगड किल्ले परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या किल्ल्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. किल्ले परिसरात जोरदार पाणी वाहत असून किल्ल्याच्या पायऱ्यांवरून देखील जोरदार पाणी वाहत आहे. या पायऱ्यांना धबधब्याचे रूप प्राप्त झाले असून या गडावर ट्रेकिंगसाठी गेलेले अनेक पर्यटक पायऱ्यांवर अडकून पडले आहेत. हे पर्यटक जीव मुठीत घेऊन स्वत:ला पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्यापासून वाचवत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, किल्ले परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे हा किल्ला पर्यटनासाठी आज पासून बंद करण्यात आला आहे. तर रोपवे देखील बंद करण्यात आला आहे.
कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड येथे देखील जोरदार पाऊस सुरू आहे. कोकणात काही परिसरात ढगफूटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे येथील नद्यांना पुराचे रूप आले आहे. आज सकाळी किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाला. किल्ल्यावरून जोरदार पाणी वाहत आहे. किल्याच्या महादरवाजातून देखील पाण्याचा मोठा लोंढा वाहत असून या लोंढयाच्या रौद्र रूपाचा व्हीडीओ व्हायरल आहे. यात अनेक पर्यटक अडकून पडले असून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतांना दिसत आहे. पर्यटकांनी एकमेकांना पकडले असून सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. हे पर्यटक थोडक्यात बचावले आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना खली उतरणे देखील कठीण होऊन बसले आहे. कसेतरी हे पर्यटक पावसाच्या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे मुसळधार पावसात गडकिल्ल्यांवर जाऊ ंनअसे असे आवाहंन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे झाली आहे. किल्ले रायगड परिसरात देखील आज सकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज ८ जुलै पासून रायगड किल्ला पर्यटक यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला असून बंदोबस्तासाठी पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.
किल्ले रायगडला रोज अनेक पर्यटक भेटी देत असतात. पावसाळ्यात याची संख्या जास्त असते. गड चढून जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, किल्ले परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे हा किल्ला बंद करण्यात आला आहे. येथील रोपवे देखील बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या किल्ल्याला भेट देणे पर्यटकांनी टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील नद्यांना पुर आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलंडली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गावाला पाण्याने वेढले आले. या गावातील घरात पाणी घुसले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य राबवले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावात देखील पुरस्थिती असून अनेक घरात पुराचे पाणी घरात गेले आहे. तर मुंबई गोवा महामार्गावर देखील पाणी साठले आहे. रविवारी आणि सोमवारी सकाळपासून कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. पुरातील पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्याचा वेग वाढवण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या