Four drowned in Kundalika River : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिलांसह चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील रेवाळमध्ये ही घटना घडली. नदीत बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले असून अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माणगाव तालुक्यातील रेवाळजे जवळ कुंडलिका नदीत ही धक्कादायक घटना घडली आहे. रवाळजे गावातील तीन महिला बुधवारी सकाळी कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. या तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. दोघांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकला यश मिळाले आहे. अद्याप दोन मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.
सिध्येश राजेंद्र सोनार (वय २१), सिद्धी गोपीचंद पेडणेकर (१६), काजल सोनार (२६) आणि सोनी सोनार (२७) अशी मृतांची नावं आहेत. मृत सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून ते शिरवली येथे आपल्या आजीच्या गावी आले असता ही दुर्दैवी घटना घडली. सिद्देश राजेंद्र सोनार आणि सिद्धी गोपीचंद पेडणेकर यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
सर्वजण नदीवर पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. सिद्देश सोनार हा मुलगा पाण्यात पडून बुडू लागला असता तीन महिला त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं चौघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला.
महिला कपडे धुत असताना मुलगा पाय घसरून नदी पात्रात पडला. मुलगा पडल्याचे पाहून महिलांना आरडाओरडा केला. शेवटी महिलांनीच त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पहिली महिला देखील बुडाली. महिलेला आणि मुलाला वाचवण्यासाठी त्यानंतर दुसरी, तिसरी अशा अन्य दोघींनी उड्या मारल्या. या दुर्घटनेत सर्वांचाच मृत्यू झाला.
बुडालेले सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते. त्यानंतर ते सर्वजण कुंडलिका नदीमध्ये पोहायला गेले. अशात सिद्देश सोनारला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी सिद्धी, काजल आणि सोनी या तिघीही नदीच्या आतमध्ये गेल्या व बुडाल्या. नवी मुंबईतून आजीच्या गावी आले असताना या चारही जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या