Raigad School Boy sexually Assaulted: राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. रोज या घटना उघड होत असतात. मात्र, या प्रकारचे अत्याचार आता मुलांवर देखील होऊ लागले आहेत. रायगड अशाच एका घटनेने हादरले आहे. येथे एका अल्पवयीन मुलांवर दोघांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना माणगाव येथील जावळी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायगडमध्ये माणगावच्या जावळी येथे मागासवर्गीय निवासी शाळेत हा प्रकार घडला आहे. दोन अल्पवयीन मुलांनी शाळेतीलच एका अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. यामुले मुलाला त्रास होऊ लागला. ही घटना त्याने शाळेतील शिक्षकांना सांगितली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे शाळेतील शिक्षक देखील हादरले आहेत. ऐवढ्या लहान वयात असे विचार व विकृती मुलांच्या मनात कशी येऊ शकते हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही मुलांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपीना बालसुधार गृहात पाठवले आहे. या घटनेमुळे आदिवासी निवासी शाळेत होणारे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी मुले आपल्या घरापासून दूर राहून शिक्षण घेत असतात. त्यात असे प्रकार उघडकीस आल्याने या शाळेतील मुले सुरक्षित आहेत का? असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव रेल्वेस्थानका जवळ एका भरधाव टेम्पोने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली. शुकरावारी रात्री हा आपघत झाला. या अपघातात दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला. यामुले त्याचा जागीच मृत्यू झळा. यज्ञेश उभारे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचा मुलगा आहे. त्याला दवाखान्यात नेत्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.