पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला

पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला

Jan 19, 2025 01:10 PM IST

Raigad Guardian Minister Issue: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची निवड केल्याने शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी रात्री मुंबई-गोवा महामार्ग रोखला.

पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला
पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला

Raigad Guardian Minister Issue: पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात मोठा राडा झाला आहे. रायगडचे पालकमंत्रीपदी शिंदे गटाचे भरत गोगवले आग्रही होते. मात्र, त्यांची निवड न करता रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची निवड केल्याने गोगवले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी काल मुंबई गोवा मार्गवर जमत टायर पेटवले. तसेच हा मार्ग रोखून धरला. यामुळे मार्गवार वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

शिवसैनिक संतप्त

भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री केल्याने रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांनी शनिवारी मुंबई गोवा मार्गावर मोठा राडा केला. महाडजवळ भरत गोगवले यांचे कार्यकर्ते व शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर पेटवले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तटकरे यांच्या निवडीचा निषेध केला. तब्बल २ तास हा मार्ग रोखून धरण्यात आला होता. अखेर पोलिसांनी घटनास्थळी येत आंदोलकांना बाजूला करत या मार्गावरील वाहतूक सुरुळीत केली. सध्या या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले व त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. मात्र, त्यांना पालकमंत्रीपद न देता आदिती तटकरे यांची निवड केल्याने सुनील तटकरे यांनी विश्वासघात केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

दरम्यान, गोगवले यांनी देखील यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय धक्कादायक आहे. मला पालकमंत्रीपद डावलने अपेक्षित नव्हते असे गोगावले म्हणालेत. हा निर्णय मनाला न पटणारा असून यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा देखील झाली नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असे देखील गोगावले म्हणाले. 

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. बीडमधील सरपंच संतोष देशमुख अपहरण हत्याप्रकरणामुळे चर्चेत असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना यादीतून वगळण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद संभाळतील. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबईचे पालकमंत्री असतील.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर