गणेश उत्सव संपवून मुंबईकडे परतणाऱ्यांच्या बसला रायगडमध्ये मोठा अपघात (Raigad accident) झाल्याचे समोर आले आहे. रायगडहून मुंबई (ऐरोली) ला येणाऱ्या बसला मोठा अपघात झाला असून ही बस ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील पाचाड आणि कोंझर दरम्यानच्या घाटात हा अपघात झाला आहे. बसमध्ये २० प्रवासी होते. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घाटात वळण घेत असताना चिखलामुळे बस घसरली व खाली दरीत कोसळली.
अपघातग्रस्त बस कोंझर घाटातून मुंबईच्या दिशेने निघाली होती. पावसाने रस्त्याच्या बाजूला चिखल झाला असून त्यात चाक घसरल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कोंझर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या बसमध्ये १० महिला व १० लहान मुले होती. बस चिखलात घसरली मात्र चालकाने झाडाचा आधार घेत बस सुरक्षितपणे थांबवण्याचा प्रयत्न केल्यानं मोठा अनर्थ टळला.
कोल्हाजूर जिल्ह्याच्या सीमेवर निपाणी येथे कंटेनवर, चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृ्त्यू झाला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर निपाणी जवळील तवंदी घाटात रविवारी सांयकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनर, कार व मोटारसायकल एकमेकांवर आदळल्याने हा विचित्रि व भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना निपाणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.