Pankaja Munde: मोठी बातमी! भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde: मोठी बातमी! भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा

Pankaja Munde: मोठी बातमी! भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा

Apr 13, 2023 01:05 PM IST

GST Raids Pankaja Munde's Sugar Factory: भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकला आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde

Raid On Vaidyanath Cooperative Sugar Factory: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकण्यात आला. आज सकाळपासून जीएसटी अधिकारी पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर पोहचले असून आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्या प्रकरणी ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आहे.

पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे. मात्र नेमकी कोणत्या कारणासाठी ही चौकशी सुरु आहे? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे याच्या कारखान्यावर जीएसटी विभागाकडून कारवाई होत असल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगडावर उपस्थित आहेत. मात्र दुसरीकडे परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर