Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, VIDEO व्हायरल

Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, VIDEO व्हायरल

Published Feb 09, 2025 05:05 PM IST

Rahul Solapurkar : राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आले होते, तसेच डॉ. आंबेडकर वेदानुसारब्राह्मणअसल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल सोलापूरकरांचे बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य
राहुल सोलापूरकरांचे बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य

Rahul solapurkar controversial statement : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आले होते, तसेच डॉ. आंबेडकर वेदानुसारब्राह्मणअसल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून सोलापूरकर यांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी;अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी माफी न मागितल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशाराही दिला आहे.

बाबासाहेब आंबेडकरांबाबत राहुल सोलापूरकर काय म्हणाले?

एका मुलाखतीत सोलापूरकर म्हणाले की, रामजी सकपाळ नावाच्या या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले भीमराव जो आंबावडेकर नावाच्या गुरुजीकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव पुढं वापरतो. तो भीमराव प्रचंड अभ्यास केल्याने वेदात म्हटल्याप्रमाणे आपल्या अभ्यासाने ब्राह्मण ठरतो, असे वक्तव्य राहुल सोलापूर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेबाबत राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केले होते. आग्र्याहून सुटण्यासाठी शिवाजी महाराजांनी लाच दिल्याचे वक्तव्य केल्यानंतर संपूर्णमहाराष्ट्रातून सोलापूरकर यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला. काही संघटनांकडून आक्रमक होत सोलापूरकर यांच्या घरावर चाल करण्यात आली होती. त्यानंतर वादग्रस्त विधानाबद्दल सोलापूरकरांनी माफी मागितली आहे. राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सोलापूरकर यांचं आणखी एक वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

जितेंद्र आव्हाडांचा संताप -

जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे,देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !!

सचिन खरात म्हणाले, मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात, असे अत्यंत निषेधार्ह विधान केलं आहे. पण, राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की, जे वेद आहेत, त्याच्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला २२ प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर